धानोरकरांनी जिंकला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:23 AM2019-05-24T01:23:34+5:302019-05-24T01:24:15+5:30

जनतेच्या सहकार्यासाठी सदैव ऋणी विशेष मुलाखत । बाळू धानोरकर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल ...

Dhanarkar - WINNER | धानोरकरांनी जिंकला किल्ला

धानोरकरांनी जिंकला किल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेससाठी १५ वर्षांनी खुलले लोकसभेचे द्वार । भाजपला मोठा हादरा

जनतेच्या सहकार्यासाठी सदैव ऋणी
विशेष मुलाखत । बाळू धानोरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या या क्षेत्रात बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. या पार्श्वभूमीवर बाळू धानोरकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : विजयाबाबत आपण काय सांगाल ?
उत्तर : पहिल्या फेरीनंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये आपण लिड केली आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, आघाडीचे नेते, यासोबतच आदिवासी, दलित, मुस्लिम व सर्व समाजातील बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखविला. मला साथ दिली. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.
खासदार म्हणून सर्वप्रथम काय कराल ?
चंद्रपूर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. आदिवासींचे राजवाडे येथे आहेत. तरीही आदिवासी बांधवांचे हाल होताना आपण पाहतो. सर्वप्रथम आदिवासी बांधवांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेन.
विजयाचे श्रेय कुणाला द्याल?
विजयाचे श्रेय मी या क्षेत्रातील तमाम जनतेला देतो. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीच्या नेत्यांनाही या विजयाचे श्रेय देतो.
केंद्रात भाजपाची सरकार येतेय, आपण काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले, याबाबत काही?
केंद्रात कुणाचीही सत्ता असो. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा देणे ही आपली स्टाईल आहे. ती कायम राहील.
 

Web Title: Dhanarkar - WINNER

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.