वाहनाच्या धडकेत अस्वल व चितळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:15 PM2018-05-20T23:15:54+5:302018-05-20T23:16:02+5:30

दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अस्वलाचा व एका चितळाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या.

Death of bear and chitalal in the wheel of vehicle | वाहनाच्या धडकेत अस्वल व चितळाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत अस्वल व चितळाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अस्वलाचा व एका चितळाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या.
मूल-सिंदेवाही मार्गावरील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील महादवाडी बिट कक्ष क्रमांक ३५६ मध्ये रस्ता ओलांडत असताना एका अस्वलाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे, चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, अति शिघ्र दल व गस्त पथकाचे प्रतिनिधी उमेशसिंह झिरे हे घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात अस्वलाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुसरी घटना सावली वनपरिक्षेत्रातील चितेगाव बिटात घडली. येथे अज्ञात वाहनाने चितळाला धडक दिली. यात चितळाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे, वनरक्षक नन्नावरे, उमेशसिंह झिरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

Web Title: Death of bear and chitalal in the wheel of vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.