पाण्यासाठी आंदोलनप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:57 AM2019-04-17T00:57:49+5:302019-04-17T00:59:05+5:30

पाण्यासाठी आक्रोश करत ग्रामपंचायतवर सोमवारी हल्लाबोल करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी अज्ञात आंदोलनकर्त्यांविरुद्ध ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे यांच्या तक्रारीवरून ३४१, १८६ कलमान्वये भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Criminal cases filed against unknown persons for water agitation | पाण्यासाठी आंदोलनप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल

पाण्यासाठी आंदोलनप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतवर हल्लाबोल प्रकरण : पाणी समस्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी : पाण्यासाठी आक्रोश करत ग्रामपंचायतवर सोमवारी हल्लाबोल करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी अज्ञात आंदोलनकर्त्यांविरुद्ध ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे यांच्या तक्रारीवरून ३४१, १८६ कलमान्वये भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते. ग्रामपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वाराला नागरिकांनी कुलूप लावले. त्यावेळी शेंडे घटनास्थळी हजर नव्हते, अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमने हे भिसी येथे घटनास्थळी आले. आंदोलकांनी ग्रामपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून टाकलेला चपलांचा हार पाहिला. घटनेची संपूर्ण माहिती घेऊन अज्ञात व्यक्तींविरूध्द पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना ग्रामविकास अधिकारी शेंडे यांना दिली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता पोलिसांच्या मदतीने कुलूप तोडण्यात आले. पोलिसांनी ग्रामपंचायत कर्मचारी व काही नागरिकांचे बयाण नोंदविले. आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पाण्याची समस्या सुटेल, अशी आशा बाळगणाºया आंदोलकांच्या मागे आता चौकशीचे शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता निर्माण झाली. आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण असून हे प्रकरण पेटविण्याऐवजी मूळ समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जंगम करीत आहेत.

सरपंच गोहणे व काळे यांची एकमेकांविरूद्ध तक्रार
सरपंच योगिता गोहणे व मालू काळे यांनी एकमेकांविरूध्द मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. आता थेट संवर्ग विकास अधिकारी जाधव यांनी भिसी येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, तत्काळ जनरेटर खरेदीला मान्यता मिळवून द्यावी, कर्तव्यात कसूर करणारे कर्मचारी व ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी अन्यथा भविष्यात पाणीप्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.

Web Title: Criminal cases filed against unknown persons for water agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी