विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:56 PM2018-03-19T23:56:23+5:302018-03-19T23:56:23+5:30

जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने शासनस्तरावरर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्षच होत गेल्याने जिल्हा परिषद अभियंता संघटनेने सोमवारपासून दोन दिवस सामूहिक रजा आंदोलनाला जिल्हा परिषदेसमोर सुरूवात केली आहे.

Collective Leave Movement of Zilla Parishad Engineers for various demands | विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

Next

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने शासनस्तरावरर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्षच होत गेल्याने जिल्हा परिषद अभियंता संघटनेने सोमवारपासून दोन दिवस सामूहिक रजा आंदोलनाला जिल्हा परिषदेसमोर सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेला नोंदणीकृत संघटना म्हणून शासन मान्यता देणे, जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना प्रवास भत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रुपये मासीक वेतन अदा करणे, औरंगाबाद खंडपीठाने ४ डिसेंबर २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार नविन उपविभाग निर्माण करणे, अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा द्यावा आदी मागण्यांसाठी जि.प. अभियंत्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संजय कोहाडे, उपाध्यक्ष विनोद शहारे, स्नेहा रॉय, विवेक डुबेवार, दिलीप ढोक, प्रमोद राजपुत, जवाहर फटींग, हरिभाऊ डोये, सतीश गोर्लावार, थामेश्वरी ठाकरे, आशिष गंधे आदींचा सहभाग आहे.

Web Title: Collective Leave Movement of Zilla Parishad Engineers for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.