चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:09 PM2019-07-15T23:09:20+5:302019-07-15T23:10:26+5:30

मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.

In Chimur taluka, 9 65 girls are to be found in thousands of children | चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय जनजागृतीचा होतोय परिणाम : मुलीचा जन्मदर हळूहळू वाढतोय

राजकुमार चुनाारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींचा दर ९३६ इतका वाढला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २०१३ मध्ये ९५४ होते. त्याच्यानंतर २०१४ पासून ते आजपर्यंत मुलींचा जन्मदर सरासरी ९५४ ते ९६७ पर्यंत गेल्यामुळे जिल्ह्यात मुलींचे म्हणजेच सावित्रीच्या लेकींचे स्वागत होत आहे.
तसे पाहिले तर एक हजार मुलांमागे ९५० इतक्या मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या व वैद्यकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात मुलगा हवा आहे, या हट्टापोटी अनेक स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली होती. २००१ ते २०११ पर्यंत मुलींचे प्रमाण सर्वसामान्य इतके होते. परंतु २०१३ व २०१४ यावर्षी मुलींचे प्रमाण ९५४ ते ९६७ इतके होते. मात्र, सध्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलींचे महत्त्व वाटू लागले आहे. तसेच समूपदेशन केले जात आहे. शासनाने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.
सध्या केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी रूग्णालयात मुलींच्या जन्मासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. मुलींची घटती संख्या ही एक भयंकर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. याची जाणीव नवीन पिढीला झाली आहे. त्यामुळे नवीन पिढीमध्ये मुलगा, मुलगी असा भेद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
असा वाढत गेला मुलींचा जन्मदर
विशेष म्हणजे, जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे रोखण्यामध्ये यश आले नसले तरी शासनाच्या पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्यामुळे मुलींचा जन्मदराचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात चिमूर तालुक्यात एक हजार मुलामागे सर्वाधिक मुलींचे प्रमाण ९८६ इतके आहे मागील पाच वर्षांपासून मुलीचा जन्मदर सरासरी ९३४ ते ९६७ पर्यंत गेला आहे. २०१३ ते २०१८ पर्यंतचा मुलींचा जन्मदर असा आहे. २०१३ मध्ये ८५४, २०१४ मध्ये ९६७, २०१५ मध्ये ८७७, २०१६ मध्ये ८९०, २०१७ मध्ये ९३४ व २०१८ मध्ये ९८६ इतका जन्मदर एक हजार मुलांमागे आहे.

Web Title: In Chimur taluka, 9 65 girls are to be found in thousands of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.