चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 04:41 PM2018-03-22T16:41:04+5:302018-03-22T16:41:14+5:30

ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Chandrapur again found a leopard dead | चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला

Next
ठळक मुद्देएक दिवस आधीही एका बिबटाचा मृत्यूतीन दिवसात तीन बिबटांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तरु ण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य निसर्गभ्रमंतीवर असताना ही घटना उघड झाली. यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. याच ठिकाणी बुधवारीही एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. या घटनास्थळापासून केवळ अर्ध्या किमीवर आज दुसरा बिबट मृतावस्थेत आढळला. मंगळवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. तीन दिवसात तीन बिबटांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Chandrapur again found a leopard dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.