चांदाचे झाले चंद्रपूर, तरीही चांदाचे आकर्षण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:09 AM2019-04-21T00:09:04+5:302019-04-21T00:12:17+5:30

चांदा हे नाव बदलून, त्या ठिकाणी चंद्रपूर असे नाव झाल्याला सुमारे ५० वर्ष झाली असणार. मात्र, चंद्रपूरकरांच्या मनातून अजूनही जुने नाव चांदा हे गेले नाही. चांदा या नावाचा कुठे ना कुठे आजही उल्लेख होत असतोच! एवढेच नव्हे तर त्यात दिवसागणिक वाढच होत असल्याचे जाणवत आहे.

Chandra, Chandra, still remains the attraction of the moon | चांदाचे झाले चंद्रपूर, तरीही चांदाचे आकर्षण कायम

चांदाचे झाले चंद्रपूर, तरीही चांदाचे आकर्षण कायम

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । मानवी वस्त्या विस्तारल्या, विकासाचे मॉडेल प्राण्यांच्या जीवावर

वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : चांदा हे नाव बदलून, त्या ठिकाणी चंद्रपूर असे नाव झाल्याला सुमारे ५० वर्ष झाली असणार. मात्र, चंद्रपूरकरांच्या मनातून अजूनही जुने नाव चांदा हे गेले नाही. चांदा या नावाचा कुठे ना कुठे आजही उल्लेख होत असतोच! एवढेच नव्हे तर त्यात दिवसागणिक वाढच होत असल्याचे जाणवत आहे.
चंद्रपूर या ऐतिहासिक (आणि, आता औद्योगिक) शहराचे मूळ नाव चांदा! त्यालाच चांदागड असेही म्हटले जात असे. चांदाचे चंद्रपूर झाले. पुढे इंग्रजांनी उच्चारण्याकरिता सोयीचे जावे याकरिता परत चंद्रपूरचे चांदा असे नामकरण केले. त्यानंतर, बºयोच वर्षांनी, महाराष्टÑ राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी ‘चांदा’ हे नाव बदलत ‘चंद्रपूर’ असे केले. तेव्हापासून शासकीय यंत्रणेत चंद्रपूर हेच नाव चालत आहे.

चंद्रपूर ते गोंदिया या रेल्वे मार्गावरील चंद्रपूर हे पहिले व शेवटचे स्टेशन. या स्थानकाचे नाव पूर्वीपासून चांदाफोर्ट आहे. चंद्रपूर झाल्यानंतरही ते तसेच कायम आहे. भद्रावती येथील आयुध निर्माणीचे नाव चांदा असे आहे. शैक्षणिक संस्था, सहकारी सोसायटी यांची नाव चांदा याच जुन्या नावावर कायम आहेत. चांदा क्लब ग्राउंड हे चांदाचे चंद्रपूर होण्यापूर्वीचे नाव. ते तसेच कायम ठेवण्यात आले आहे. या ग्राउंडमुळे चांदा हे नाव चंद्रपूरकरांच्या कानावर सारखे पडत असते. जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये भर पडत आहे. त्यात चांदा हे नाव दिसून येते. काही युवा संघटनांची नाव चांदा या नावाने आहे. चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे अनेक भाविक नांदेडहून येथे येत असतात. त्यांच्या तोंडून बहुधा चांदा हेच नाव ऐकायला मिळते.
सोबतच, देवी महाकालीच्या प्रशंसेत जी लोकगीत प्रचलित आहेत. त्यात चांदा वा चांदागड असा चंद्रपूरचा उल्लेख येतो. ती लोकगीते नांदेडकडील लोक गावू लागतात. असा उल्लेख करताना चांदा ते बांदा असा सर्वत्र उल्लेख केला जाते
निवडणुकांमध्येही ‘चांदा’ असाच उल्लेख
राजकीय नेत्यांच्या तोंडून नेहमीच चांदा ते बांदा ऐकायला मिळते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रसंगी, मागील निवडणुकीच्या मागोवा वृत्तपत्रांमधून घेत असताना चांदा लोकसभा, विधानसभा असे वाचायला मिळते. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत वृत्तपत्र वाचकांना त्याचा अनुभव आलाच आहे. एकंदरीत, चांदा हे नाव बदलून चंद्रपूर असे नामकरण होउन पन्नास वर्षे झाली आहेत. मात्र चांदा या नावाचाच या ना त्या कारणांनी उल्लेख होतच असतो. या बाबींवरून चांदा या शब्दाचे महात्म्य असे आहे.

Web Title: Chandra, Chandra, still remains the attraction of the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.