कचरा जाळून प्रदूषणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:17 AM2018-01-12T00:17:18+5:302018-01-12T00:17:32+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

Burning of waste helps pollution | कचरा जाळून प्रदूषणाला हातभार

कचरा जाळून प्रदूषणाला हातभार

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाचा अफलातून कारभार : स्वच्छता अभियानात प्रदूषण वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. आधीच प्रदूषित असलेले शहर यामुळे आणखी प्रदूषित होत आहे.
‘चंद्रपूर शहर स्वच्छ होतेय’ असे ब्रिद सध्या शहरातील चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर झळकत आहे. ते खरेही आहे. सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान गंभीरतेने राबविले जात आहे. घराघरातून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे. नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरातील रस्ते, गल्लीबोळात नियमित झाडू फिरत आहे. या सर्व प्रकारामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र या शहर स्वच्छ अभियानात मनपा प्रशासनाचे प्रदूषणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
आधीच चंद्रपूरचे प्रदूषण राज्यभर कुप्रसिध्द आहे. येथील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणे सुरू झाले आहे. त्यामुळे प्रदूषण कसे कमी करता येईल, यासाठी जिल्हा, मनपा, जि.प. प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु प्रदूषणाबाबत या प्रशासनाला काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. महानगरपालिकेने स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे.
यावर नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. एखाद्या ठिकाणी कचरा दिसला, प्लॉस्टिक डम्प करून दिसले की नागरिक त्याचे छायाचित्र स्वच्छता अ‍ॅपवर टाकून तक्रार करतात. या तक्रारीची मनपाकडून तातडीची दखल घेतली जात आहे. तत्काळ तेथे मनपाचे स्वच्छता कर्मचारी पोहचतात. मात्र तेथील कचरा उचलून डम्पींग यार्डवर नेण्याऐवजी तो तेथेच जाळला जात आहे. यामुळे प्रदूषण प्रचंड वाढत आहे. कचरा, प्लॉस्टिक जाळल्यामुळे होणाºया धुराचा नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. यासोबत वातावरणही प्रदूषित होत आहे. उल्लेखनीय बाब अशी की संपूर्ण शहरात सर्वत्र असाच प्रकार सुरू आहे. नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅपवर एखाद्या वॉर्डात कचरा आढळून येत असल्याची तक्रार करताच मनपाचे सफाई कामगार तेथे येऊन कचरा जाळून टाकतात. त्यात प्लॉस्टिकचाही समावेश मोठा असतो.
नागरिकांनी जागृत व्हावे
चंद्रपूरचे प्रदूषण वाढण्यामागे कोळशाचे जाळणे, शेगड्या पेटविणे, कचरा-प्लॉस्टिक जाळणे या बाबीही तेवढ्याच कारणीभूत आहेत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागृत होऊन कचरा पेटवू नये. मनपाच्या सफाई कामगार तसे करताना दिसत असतील, तर त्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात.
पूर्वीपासूनच हीच पद्धत
जमिनीवरील घाण हवेत पसरविण्याचा घाणेरडा प्रकार आजचा नाही. पूर्वीपासून असेच घडत आले आहे. पूर्वीही रस्त्याच्या कडेला, एखाद्या भिंतीच्या आडोशाला किंवा चौकाच्या एका बाजुला संग्रहित झालेला कचरा तेथेच जाळला जात होता. अनेकवेळा तर कचराकुंड्यातील कचराही जळताना पाहण्यात आले आहे. याशिवाय डम्पींग यार्डवरही अनेकवेळा कचºयाला आग लावण्यात येत होती. ही बाबच चंद्रपूरला प्रदूषित करण्याला कारणीभूत ठरली आहे.
वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यक
कचरा, प्लॉस्टिक जाळून वायू प्रदूषण करण्याचा हा प्रकार गंभीर आहे. सफाई कामगारांना तसे सांगण्यात येत असेल तर तो प्रकार आणखी गंभीर आहे. मात्र सफाई कामगार आपल्याच मर्जीने शहरातील कचरा जाळत असतील, त्यांना आताच आवर घालणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

Web Title: Burning of waste helps pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.