जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या अवंतीला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:51 PM2018-02-13T15:51:58+5:302018-02-13T15:52:45+5:30

काठमांडु येथे पार पडलेल्या जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत मूल येथील अवंती अनिल गांगरेड्डीवार हिने सुवर्णपदक पटकाविले.

Avanti Gold Medal in Chandrapur district of the World Seeky Martial Arts Championship | जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या अवंतीला सुवर्णपदक

जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या अवंतीला सुवर्णपदक

Next
ठळक मुद्देइंडोनेशियातील स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काठमांडु येथे पार पडलेल्या जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत मूल येथील अवंती अनिल गांगरेड्डीवार हिने सुवर्णपदक पटकाविले. मे २०१८ ला इंडोनेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
अवंती गांगरेड्डीवार हिने स्थानिक नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या विसापूर येथे बीपीड करीत आहेत. मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षक संदिप पेदापल्लीवार यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धेत अव्वल ठरली आहे. शालेय स्तरापासून मार्शल आर्टची आवड असणाऱ्या अवंतीने नाशिक व गोवा येथील स्पर्धेतही सुवर्णपदक प्राप्त केले. वडिल अनिल गांगरेड्डीवार हे शिक्षक पदावर कार्यरत असून ते योगाचे धडे देतात.

Web Title: Avanti Gold Medal in Chandrapur district of the World Seeky Martial Arts Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा