अटलजींच्या ‘त्या’ आठवणींचा कार्यकर्त्यांना गहिवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:20 AM2018-08-17T00:20:25+5:302018-08-17T00:21:07+5:30

जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली.

Atalji's memories of the memories of the workers | अटलजींच्या ‘त्या’ आठवणींचा कार्यकर्त्यांना गहिवर

अटलजींच्या ‘त्या’ आठवणींचा कार्यकर्त्यांना गहिवर

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपुरातील स्मृती : तीनही दौऱ्यात कार्यकर्त्यांच्याच घरी केले भोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्ते तणावात असतानातच अटलजी म्हणाले, ‘आपने लक्ष्य पूरा नही किया, ये बढी बात नही. लेकीन पूरा जोरसे ताकत लगाया ये बहुत बडी बात है.’ १९८२ ला चंद्रपुरात घडलेली ही घटना. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या आठवणींना उजाळा देताना गहिवरले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे चंद्रपूर शहरात तीनदा येऊन गेलेत. राजकारणाच्या पलिकडे विविध विषयांचा व्यासंग जोपासणारे अटलजींनी चंद्रपुरातील तिनही दौºयात नागरिकांची मने जिंकली. १९७८ ला राजे विश्वेश्वराव आत्राम यांच्या प्रचारासाठी आले होते. १९८२ ला अ‍ॅड. दादा देशकर यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढली होती. या प्रचारसभेत अटलजींनी अत्यंत तन्मयतेने देशातील ज्वलंत समस्यांची मांडणी केली होती. ही आठवण रमेश बागला यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितली.
पक्षनिधीसाठी ११ लाख गोळा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले. परंतु ही रक्कम जमली नाही. ‘अटलजी काय म्हणतील’ ही भिती मनात ठेवूनच आम्ही एक लाखाचा निधी त्यांच्याकडे सुपूर्त केला. हा अल्प निधी असल्याचे लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. कार्यकर्त्यांची पाठराखण केली. हा प्रसंग विसरु शकत नाही, असेही बागला यांनी सांगितले.
‘चंद्रपूर आने की, जरूरत नही थी’
१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. देशभरात प्रचारसभा गाजवत असताना चंद्रपुरातही आले होते. ही सभा चांदा क्लब ग्राऊंडवर झाली. सभेनंतर विश्रामगृहात अटलजींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘यहा सुधीर जैसा स्ट्राँग कॅन्टेड खडा है मुझै आने की, जरुरी नही थी’ अशी टिप्पणी त्यांनी केली होती, अशी आठवणही रमेश बागला यांनी सांगितली.
देशातील असंख्य कार्यकर्त्यांचे पितृछत्र हरपले - सुधीर मुनगंटीवार />१९८९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते चंद्रपूरला सभेसाठी आले होते. त्यावेळी मी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवार होतो. अटलजींनी त्यावेळी आपल्या भाषणात म्हटले होते की, ‘ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा’. अटलजींचे ते आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. माझ्या समाजिक आणि राजकीय प्रवासात त्यांचे हे कौतुकोद्गार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले, अशी शोकसंवेदना जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. एक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींच्या जाण्याने एका ध्यासपर्वाची अखेर झाली आहे, तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. भारतीय राजकारणात, समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला, पण तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
चंद्रपूरच्या समस्या जाणल्या
१९७८, १९८२ व १९८९ या तिनही दौऱ्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्रपुरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे जेवण केले. बडेजाव न करता भाजपचे तत्कालीन युवा कार्यकर्ते रमेश मांडलिक, सुरेश चिमूरकर व घागगुंडे कुटुंबीयांना हा सन्मान मिळाला. खाली चटईवर बसून जेवण करताना अटलजींनी कुटुंबीयांसह चर्चा केली. जिल्ह्याच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या

Web Title: Atalji's memories of the memories of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.