चंद्रपूरात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्‍ये कंत्राटी पद्धतीने होणार डॉक्टरांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:14 PM2019-06-14T17:14:21+5:302019-06-14T17:16:20+5:30

जिल्‍हाधिका-यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एका समितीने थेट मुलाखती घेवून डॉक्‍टरांची नियुक्‍ती करण्‍याचे धोरण ठरविण्‍यात आले आहे.

Appointing doctors to be appointed contractually at primary health centers in Chandrapur | चंद्रपूरात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्‍ये कंत्राटी पद्धतीने होणार डॉक्टरांची नियुक्ती

चंद्रपूरात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्‍ये कंत्राटी पद्धतीने होणार डॉक्टरांची नियुक्ती

Next

चंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्‍ती करण्‍यात येणार असून चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी या मागणी संदर्भात केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 13 जून 2019 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्‍णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्‍यामुळे जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्‍हयात कंत्राटी पद्धतीने डॉक्‍टरांच्‍या नेमणुका करण्‍याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे मागणी केली होती. त्‍याअनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने विशेष बाब या सदराखाली जिल्‍हयात 40 हजार रू. प्रतीमाह वेतनावर डॉक्‍टरांची नियुक्‍ती कंत्राटी पद्धतीने करण्‍याबाबत मान्‍यता देण्‍यात आली आहे.

जिल्‍हाधिका-यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एका समितीने थेट मुलाखती घेवून डॉक्‍टरांची नियुक्‍ती करण्‍याचे धोरण ठरविण्‍यात आले आहे. परंतु 40 हजार रू. हे वेतन अत्‍यल्‍प असल्‍यामुळे डॉक्‍टरांचा प्रतिसाद या नेमणूक प्रक्रियेला लाभला नाही. त्‍यामुळे आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने हे वेतन 70 हजार रू. करण्‍यात आले आहे. आता समिती मार्फत थेट मुलाखती घेवून प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये डॉक्टरांच्या नियुक्‍त्‍या करण्‍याचा  मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुरळीत होण्‍यास मोलाची मदत होणार आहे.

Web Title: Appointing doctors to be appointed contractually at primary health centers in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.