जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलिसाला चिरडलं; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 07:27 AM2019-01-21T07:27:41+5:302019-01-21T15:31:06+5:30

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर खांबाडा चेकपोस्टवरी घटना

animal traffickers crashed policeman in chandrapur | जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलिसाला चिरडलं; दोघांना अटक

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलिसाला चिरडलं; दोघांना अटक

Next

चंद्रपूर: जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तस्करांच्या वाढत्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

यवतमाळहून नागपूरकडे जाणाऱ्या एका वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्टवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं. जनावरांची तस्करी करणारं वाहन रात्री अकराच्या सुमारास चेकपोस्टवर आलं. त्यावेळी पोलिसांनी वाहन थांबवण्यास सांगितलं. मात्र वाहन चालकानं वेग वाढवला आणि एका शिपायाला चिरडलं. यामध्ये शिपायाचा मृत्यू झाला. प्रकाश मेश्राम असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. 

दोनच महिन्यांपूर्वी चंद्रपूरात अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनानं पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना चिरडलं होतं. चिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. छत्रपती चिडे मौशी चोरगावजवळ गस्तीवर असताना ही घटना घडली. अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिडे यांना उडवलं. त्यांना जखमी अवस्थेत ब्रम्हपुरीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: animal traffickers crashed policeman in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.