‘आॅनलाईन’मध्ये अडकल्या अंगणवाडीताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:21 PM2019-06-17T23:21:35+5:302019-06-17T23:21:50+5:30

जिल्ह्यातील गावागावांत अंगणवाडी सेविका बालकांच्या गळी मराठी उतरविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. शासन मात्र या अंगणवाडी सेविकांवर एकामागून एक कामांचा व्याप वाढवून त्यांना त्रस्त करून सोडत आहे. एवढेच नव्हे तर संगणक अज्ञान असलेल्या सेविकांवर आॅनलाईनचे ओझे टाकण्यात आले असून आता त्या आॅनलाईनमध्ये अकडल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

Anganwadiya stuck in 'online' | ‘आॅनलाईन’मध्ये अडकल्या अंगणवाडीताई

‘आॅनलाईन’मध्ये अडकल्या अंगणवाडीताई

Next
ठळक मुद्देकामाचा व्याप वाढला : तुटपुंज्या मानधनात कसे करायचे काम ?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील गावागावांत अंगणवाडी सेविका बालकांच्या गळी मराठी उतरविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. शासन मात्र या अंगणवाडी सेविकांवर एकामागून एक कामांचा व्याप वाढवून त्यांना त्रस्त करून सोडत आहे. एवढेच नव्हे तर संगणक अज्ञान असलेल्या सेविकांवर आॅनलाईनचे ओझे टाकण्यात आले असून आता त्या आॅनलाईनमध्ये अकडल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरूवात बालवाडीपासून होते. म्हणूनच ग्रामीण भागात शिक्षणाचे उगमस्थान म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. शासनाने प्रत्येक गावी अंगणवाडी उघडून तेथे बालकांना धडे देण्यासाठी एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीसांची नेमणूक केली आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीला रोखण्याची मोठी जबाबदारी या अंगणवाडी सेविकांवर आली आहे. मात्र आता अंगणवाडी सेविकांकडे इतर कामे मोठ्या प्रमाणात सोपविली जात आहे. त्यांच्याकडे गावाचे कुटुंब सर्वेक्षण मुलांची दैनंदिनी, गरोदर माता व स्तनदा मातांची नोंदणी, गावातील किशोरवयीन मुलींची नोंदणी, लसीकरण, गृहभेटी आदी कामे अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. अंगणवाडीतील मुलांना सकस आहार बनूवन त्यांना खाऊ घालणे आणि गावातील स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार धान्याचे वाटप करणे, ही कामेही करावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर याच्या सर्व नोंदी आॅनलाईन नोंदावयाच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला एक भ्रमणध्वनी संच पुरविण्यात आला आहे. इंटरनेट खर्चासाठी प्रतिमाह ४०० रूपये देण्यात येत आहे. ही सर्व माहिती पाठविण्यासाठी एक अ‍ॅप देण्यात आले आहे. मात्र ही माहिती आॅनलाईन पाठविताना अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत आहे. बहुतांश अंगणवाडी सेविका वयस्कर व सातवी ते दहाविपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यांना मोबाईलचे पाहिजे तेवढे ज्ञान नाही. त्यांना आॅनलाईन माहिती पाठविणे म्हणजे, अशक्यप्राय होत आहे. तसेच अनेक गावांमध्ये नेटची रेंजसुद्धा नसते, अशावेळी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कधी अ‍ॅपचा सर्व्हर काम करीत नाही. कधी मोबाईल हाताळताना संपूर्ण डाटाच डिलीट होत आहे. अशावेळी मात्र या सेविकांची अतिशय घाबरगुंडीच उडत आहे.
संगणक अज्ञानी असलेल्या बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांना मग एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी स्वत: जवळचे पैसे खर्च करावे लागतात. केवळ सात हजार रूपये मासिक तुटपुंजा मानधनातून हा आॅनलाईनचा खर्च त्यांना आर्थिक अडचणीत आणणारा ठरत आहे.

आॅपरेटरची नेमणूक करावी
अंगणवाडी केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयात एक तज्ज्ञ संगणक आॅपरेटर देण्याची गरज आहे. म्हणजे हा आॅपरेटर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना आॅनलाईनच्या कामात मदत करू शकतील. त्यामुळे सेविकेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका चिमुकल्यांना ज्ञानार्जनाचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करतात. काही वेळा शासकीय अडचणी तर काहीवेळा गावातील राजकारण त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यातच मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने मागील काही वर्षांपासून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र या आंदोलनाला अद्यापपर्यंत यश आले नाही. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणात मानधन देण्यात येते, मात्र महाराष्ट्रात त्यांच्यावर अन्याय होत आहे.

Web Title: Anganwadiya stuck in 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.