अमरावतीचा विजय भोयर ठरला ‘खासदार श्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:57 PM2019-01-22T22:57:47+5:302019-01-22T22:58:17+5:30

सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या खासदार चषक २०१९ विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ चषक तर अमरावतीचाच सर्वेश साहू हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला.

Amravati's Vijay Bhoyar becomes 'MP Shri' | अमरावतीचा विजय भोयर ठरला ‘खासदार श्री’

अमरावतीचा विजय भोयर ठरला ‘खासदार श्री’

Next
ठळक मुद्देसर्वेश साहू बेस्ट पोझर : विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या खासदार चषक २०१९ विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ चषक तर अमरावतीचाच सर्वेश साहू हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला.
शिवाजी चौक, पटेल हायस्कूलसमोर पार पडलेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत चंद्रपूरसह नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. बक्षीस वितरणाप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, बॉडी बिल्डींगमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांनी चिकाटी न सोडता राज्य व राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. कमल स्पोर्टींग क्लबने खेळाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांशी बांधिलकी जोपासत कार्य करावे, असेही ना. अहीर म्हणाले. यावेळी विजय राऊत, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राहुल सराफ, उपमहापौर अनिल फुलझेले, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजयुमोचे मोहन चौधरी, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, आयबीबीएफ विदर्भ अध्यक्ष राजेश तोमर, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, जिल्हाध्यक्ष दिलीप सेनगारप, सचिव नरेंद्र भुते व अन्य मान्यवर उपस्थित होते. जि. प. अध्यक्ष भोंगळे व विजय राऊत यांनीही स्पर्धेच्या उपयोगीतेवर भाष्य केले. राष्ट्रीय पंच म्हणून दिलीप सेनगारप व नरेंद्र भुते यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाप्रसंगी राहुल गायकवाड, सतीश गोहोकार, पवन पुरेली, शिवम त्रिवेदी, रवी बनकर, अभिनव लिंगोजवार, जितेश वासेकर, धनंजय मुफकलवार, विपिन मेंढे, अक्षय ठक्कर, फैजान शेख, इम्रान खान, श्यामल अहीर, चंदन अहीर, महेश अहीर, विनय अहीर, अजेय अहीर, कमल कजलीवाले, हेमराज काबलीया, वैभव कजलीवाले यांनी सहकार्य केले.

स्पर्धेतील पुरस्कार विजेते
बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ पारितोषिकाचा मानकरी ठरला. ६० कि.गॅ्र. वजन गटातील निलेश राऊत (अमरावती) प्रथम तर मनोज महाले नागपूर द्वितीय, सुशिल पटले तृतीय, संदीप ठाकूर चतुर्थ तर अक्षय टिकेकर अमरावती पाचव्या पुरस्काराचा मानकरी ठरला. ६५ कि.ग्रॅ. वजन गटातील विजय ढोके अकोला प्रथम, श्रीकांत बोरसरे चंद्रपूर द्वितीय, संजय श्रीवास नागपूर तृतीय, मनीष बाथे नागपूर चतुर्थ, मनोज पहुरकर बुलढाणा पाचवा, ७० कि.ग्रॅ. वजनगट अफाक खान नागपूर प्रथम, सॅम गिचारीया नागपूर द्वितीय, अभिषेक गायकवाड नागपूर तृतीय, शुभम कडू नागपूर चतुर्थ, योगेश विश्वकर्मा, नागपूर पाचवा, ७५ कि.ग्रॅ. गटात कमलेश कश्यप, चंद्रपूर प्रथम, आमिर शफी, नागपूर द्वितीय, सुयश जडीये, अकोला तृतिय, सैयद रशिद नागपूर चतुर्थ, राम अटकापुरवार चंद्रपूर पाचवा, ८० कि.ग्रॅ. गटात प्रणिल लांजेवार नागपूर प्रथम, इशांत पंडित नागपूर द्वितीय, नुसरत खान अकोला तृतीय, मजहर बेग चंद्रपूर चतुर्थ, रवी वाकोडे चंद्रपूर पाचवा, ८५ कि.ग्रॅ. सर्वेश साहू अमरावती प्रथम, वैभवन मकंर्टेवार अकोला द्वितीय, किशन तिवारी नागपूर तृतीय, आकाश दुब्बलवार अमरावती चतुर्थ, गुलशन सिंह सिद्धू नागपूर पाचवा, ८५ कि.ग्रॅ.वरील स्पर्धकात संतोष वाघ वर्धा द्वितीय, रविंद्र ठाकरे भंडारा तृतीय, शेख सलमान खान अमरावती चतुर्थ तर अमरावती येथील अक्षय पतंगरे यांना पाचवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Amravati's Vijay Bhoyar becomes 'MP Shri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.