ग्रामस्वच्छतेत सर्वांचे योगदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:14 AM2019-02-24T00:14:07+5:302019-02-24T00:14:55+5:30

दिवसेंदिवस वाढते आजार गावापासून दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक ग्रामवासियांनी श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित सामुदायिक ग्रामस्वच्छतेच्या कार्यात उत्स्फुर्तपणे योगदान दिले पाहिजे. त्याचबरोबर समाजातील बुवाबाजी अंधश्रद्धा यापासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन राजुऱ्याचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांनी केले.

All contributions to rural cleanliness are essential | ग्रामस्वच्छतेत सर्वांचे योगदान आवश्यक

ग्रामस्वच्छतेत सर्वांचे योगदान आवश्यक

Next
ठळक मुद्देओमप्रकाश रामावत : अंतरगाव येथे कार्यकर्ता मेळावा तथा व्यसनमुक्त ग्रामस्थांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : दिवसेंदिवस वाढते आजार गावापासून दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक ग्रामवासियांनी श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित सामुदायिक ग्रामस्वच्छतेच्या कार्यात उत्स्फुर्तपणे योगदान दिले पाहिजे. त्याचबरोबर समाजातील बुवाबाजी अंधश्रद्धा यापासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन राजुऱ्याचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांनी केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव (बू) द्वारा आयोजित श्री गुरुदेव सक्रीय प्रचारक, कार्यकर्ता मेळावा तथा व्यसनमुक्त ग्रामस्थांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत जेनेकर, सरपंच अनिता टेकाम, प्रेमलाल पारधी, लटारू मत्ते, मोहनदास मेश्राम, नानाजी डोंगे, सुवर्णा कावळे, अ‍ॅड. सारीका जेनेकर, उपरे, तलाठी वाटेकर, अमरनाथ जिवतोडे, मारोती लांडे, सुभाष पावडे, मधूकर बोबडे आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश मडावी, संतोष भोयर, शंकर पेटकर, बाळा देवाळकर, मुर्लीधर मडावी, आनाजी कावळे, सजाराम मिलमिले या व्यसनमुक्त जीवन जगणाºया ग्रामस्थांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दरम्यान अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, लटारू मत्ते, मेश्राम, सुवर्णा कावळे, अ‍ॅड. सारीका जेनेकर व उपस्थित प्रचारकांनी समायोजित मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले, राष्ट्रसंतांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविला. अंर्तबाह्य शुद्धीवर भर दिला या विचारातून श्री गुरुदेव मंडळातर्फे व अंतरगाव (बु) च्या ग्रामस्थांनी चालविलेले ग्रामशुद्धीचे कार्य कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष सतीश देवाळकर यांनी केले. संचालन शैलेश कावळे तर आभार कृष्णा खोके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता नानाजी देवाळकर, प्रकाश ढोठी, सचिन खोके, सतीश कावळे, नागोबा खोके, महादेव नवघडे, दादाजी कडूकर, नितीन खोके, विठ्ठल वैद्य, वसंता नवघडे, तिरुपती कावळे, दत्तू खोके यांनी अथक परिश्रम घेतले. रात्री मंगेश पोडे यांचा मनोरंजनातून समाज प्रबोधनपर नकलांचा व कीर्तनकार जयश्री गावतुरे यांचा कार्यक्रम झाला.

Web Title: All contributions to rural cleanliness are essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.