गडचांदूर नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:07 PM2019-07-15T23:07:35+5:302019-07-15T23:08:00+5:30

गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी नागरिकांनी नगर परिषदेवर आज सोमवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून जन आक्रोश मोर्चा काढला.

Agroche Morcha on Gadchandur Nagar Parishad | गडचांदूर नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा

गडचांदूर नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा

Next
ठळक मुद्देमहिलांची लक्षणीय उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी नागरिकांनी नगर परिषदेवर आज सोमवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून जन आक्रोश मोर्चा काढला.
या मोर्चात गडचांदूरमधील जनता मोठया संख्येत सहभागी होऊन नगरपरिषदेच्या कारभाराविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. या मोर्चाच्या प्रमुख मागण्यामध्ये नगर परिषदेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या ७७ लाभार्थीच्या घरकूल यादीतील श्रीमंत लोकांची नावे वगळून गरजू लाभार्थ्यांना घरकुल वाटप करण्यात यावे, घरकूल वाटपात भेदभाव न करता लाभार्थ्यांना निकषाच्या आधारे त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचे अवलोकन करून मौका चौकशी करून क्रम लावून प्राधान्य देण्यात यावे, पाणी पट्टी कर १५०० रुपये वरून ९०० रुपये करावा, प्रभाग ३ मध्ये मंजूर असलेल्या पाणी टाकीचे काम जिल्हा परिषदेच्या जागेवर त्वरित सुरू करावे, माणिकगड कंपनीच्या करामध्ये वाढ करावी, विकास निधीचे समांतर वाटप करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा गांधी चौक येथून काढून नगरपरिषद येथे नेण्यात आला. त्यानंतर तिथे घोषणा देण्यात आल्या.
मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना निवेदन दिले. यांतील प्रमुख मागणी ७७ लोकांच्या मंजूर घरकूल यादीतील श्रीमंतांची नावे वगळावे, त्या यादीमधील काही नावे वगळल्यात येणार, असे जाहीर केले. हा मोर्चा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय गोरे, बबन उरकुडे, बालाजी मुंडे, माजी शहर प्रमुख राजू मूळे, आदिवासी सेनाचे तालुका प्रमुख पुरुषोत्तम मेश्राम, युवा सेनेचे शहर प्रमुख मयूर एकरे, किशोर बोबडे, विककी उरकुडे, नगरसेविका चंद्रभागा कोरवते आदी उपस्थित होते.

Web Title: Agroche Morcha on Gadchandur Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.