प्रगत आणि दुर्गम माणसाला श्रमाने जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:10 PM2018-05-21T23:10:58+5:302018-05-21T23:11:15+5:30

१९६७ साली सुरू झालेल्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीला ५१ वर्षे पूर्ण झाली, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. परंतु श्रमसंस्काराचे धडे शेवटी अशा शिबिरातच रूजतात, अशा प्रतिक्रिया अतिदुर्गम व प्रगत भागातून शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी दिल्या.

Adding to the advanced and remote people was added | प्रगत आणि दुर्गम माणसाला श्रमाने जोडले

प्रगत आणि दुर्गम माणसाला श्रमाने जोडले

Next
ठळक मुद्देश्रमसंस्कार घेऊन परतले शिबिरार्थी : ३५० जणांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
मारोडा : १९६७ साली सुरू झालेल्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीला ५१ वर्षे पूर्ण झाली, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. परंतु श्रमसंस्काराचे धडे शेवटी अशा शिबिरातच रूजतात, अशा प्रतिक्रिया अतिदुर्गम व प्रगत भागातून शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी दिल्या.
या शिबिराचा शनिवारचा शेवटचा दिवस शिबिरार्थीनी सकाळपासून श्रमातच घालविला. सूर्योदय होण्यापूर्वी श्रमातून दिलेले उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण होत होते. भामरागडमधून आलेल्या युवकांसाठी श्रमसंस्कार ही बाब नवीन नव्हती. परंतु पुणे, मुंबई, लातूरच्या सिमेंटच्या इमारतीत वाढलेल्यांना कुºहाड, पावडे, टोपल्या ही अवजारे कुतुहलाचा विषय होता. सांस्कृतिक मंचावर मात्र दुर्गम भागातील युवकांनीही आपल्या कला सादर केल्या. ते शहरी लाभार्थ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटणारे ठरले. प्रगत आणि दुर्गम अशा दोन विरुध्द टोकांवरील माणसांना श्रमाने पाच दिवस जोडून ठेवले होते. झोपेचा काळ सोडून आपण आपला दिवस कसा व्यस्त ठेवू शकतो. श्रमाचे मूल्य नेमके काय याचे गणितच त्यांना कळले. आजच्या प्रगत युगात गुगलवर जावून एका क्लिकवर जगाची माहिती घेता येते.
परंतु संस्कार रूजविण्यासाठी मात्र १९६७ साली समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेली श्रमसंस्कार छावणी किती उपयोगी आहे, याचा अनुभव घेऊन सर्व शिबिरार्थी सोमवारी आनंदवनात पोहचले.

Web Title: Adding to the advanced and remote people was added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.