शालेय आहार शिजविणाऱ्यांना नऊ पैशाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:13 AM2019-07-22T00:13:31+5:302019-07-22T00:14:38+5:30

विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच बौद्धिक वाढ व्हावी, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिल्या जाते. मात्र भोजन शिजविणाºया महिलांना प्रति विद्यार्थी अल्पदर दिला जात असल्याने या योजनेकडे काही गावांतील महिलांनी पाठ फिरविली होती.

9 paisa increase in school cooks | शालेय आहार शिजविणाऱ्यांना नऊ पैशाची वाढ

शालेय आहार शिजविणाऱ्यांना नऊ पैशाची वाढ

Next
ठळक मुद्देदिलासा की थट्टा? : महागाईच्या तडाख्यात कसे करावे काम?

साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच बौद्धिक वाढ व्हावी, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिल्या जाते. मात्र भोजन शिजविणाºया महिलांना प्रति विद्यार्थी अल्पदर दिला जात असल्याने या योजनेकडे काही गावांतील महिलांनी पाठ फिरविली होती. आता शासनाने यामध्ये वाढ केली आहे. ही वाढ प्रति विद्यार्थी केवळ नऊ पैसे आहे. त्यामुळे शासनाना पोषण आहार शिजविणाºया महिलांना दिलासा दिला की थट्टा केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वाढीव दरामुळे विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळणार की पुन्हा जुनीच स्थिती राहणार, यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे.
विद्यार्थ्यांमधील कुपोषण आणि आजार टाळण्यासाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरु केली. या माध्यमातून प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न दिल्या जाते. यामध्ये शासनाकडून अन्नधान्य पुरविल्या जाते. तर अन्न शिजविण्याची जबाबदारी शाळा समितीच्या निर्णयानुसार गावातील एखाद्या बचतगटांकडे किंवा निराधार महिलांकडे सोपविण्यात येते. मात्र प्रतिविद्यार्थी देण्यात येणाºया मोबदल्यामध्ये अत्यल्प दर असल्याने काही बचतगटांनी या योजनेकडे पाठ फिरविली. परिणामी मुख्याध्यापकांना कसरत करून गावातून अन्न शिजवावे लागत होते. यामुळे शासनाने १९ जुलै रोजी नवा अध्यादेश काढला असून अन्न शिजविणारे, भाजीपाला तसेच पुरक आहारात काही प्रमाणात वाढ केली आहे. पूर्वी पहिली ते पाचवीपर्यंत प्रति विद्यार्थी या महिला बचत गटांना १.५७ पैसे दिल्या जात होते. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून १ रुपये ६६ पैसे प्रति विद्यार्थी देण्यात येणार आहे. यामध्ये भाजीपाला, इंधन आणि पुरक आहारही द्यावा लागणार आहे. तसेच माध्यमिकमध्ये ६ वी ते ८ वीसाठी महिला बचत गटांना पूर्वी प्रति विद्यार्थी २ रुपये ३५ पैसे दिल्या जात होते. आता २ रुपये ४९ पैसे देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. शहरातील शाळांमध्ये तयार आहाराचा पुरवठा करणाºया यंत्रणेला १ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी ४.४८ पैसे प्रति विद्यार्थी तर ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ७.७१ पैसे प्रति विद्यार्थी अन्न शिजविण्याचा दर देण्यात येणार आहे. या वाढलेल्या दरामुळे महिला बचत गट किंवा निराधार महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र तो अत्यल्प असल्याने विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळणार की पुन्हा जुनीच स्थिती राहणार यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे.

महिलांमध्ये संताप
ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्राथमिकसाठी अन्न शिजविण्यासाठी पूर्वी १.५७ पैसे प्रति विद्यार्थी देण्यात येत आहे. यामध्ये आता केवळ १ रुपये ६६ पैसे म्हणजेच केवळ ९ पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पुरक आहारावर प्रश्नचिन्ह
शालेय पोषण आहारामध्ये अन्न शिजविण्याच्या दरामध्ये अल्प वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरक आहार मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, शासन निर्णयानुसार या बचत गटांना विद्यार्थ्यांना पुरक आहार द्यावा लागणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ४.५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथीनेयुक्त आहार तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ७०० उष्मांक आणि २० गॅॅ्रम प्रथीनेयुक्त आहार देणे गरजेचे आहे. यामध्ये शासनाने काही निकष ठरवून दिले आहे. मात्र या निकषानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्यास एक दमडीही शिल्लक राहणार नसल्याचे मत बचतगट तसेच निराधार महिलांनी व्यक्त केले आहे.

Web Title: 9 paisa increase in school cooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा