९ लाख ९१ हजार पुस्तकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:55 PM2018-06-19T22:55:09+5:302018-06-19T22:55:19+5:30

येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार असून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बालभारतीकडे नोंदणी झालेल्या पंचायत समित्यांना थेठ पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली.

9 lakh 91 thousand books registered | ९ लाख ९१ हजार पुस्तकांची नोंदणी

९ लाख ९१ हजार पुस्तकांची नोंदणी

Next
ठळक मुद्दे९३ टक्के शाळांना पाठ्यपुस्तके वाटप : बालभारतीकडून पंचायत समित्यांना थेट पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार असून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बालभारतीकडे नोंदणी झालेल्या पंचायत समित्यांना थेठ पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली. २६ जूनपर्यंत १०० टक्के उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
सर्वाशिक्षा अभियानअंतर्गत जिल्हा परिषद, मनपा, नगरपरिषद, शासकीय, अनुदानीत, अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. यापूर्वी पाठ्यपुस्तकांची मागणी जिल्हास्तरावर पार पडली. पुस्तकांच्या नोंदणीची संख्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठविल्यानंतर बालभारतीकडे माहिती सादर होत असे. त्यानंतर ही पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचत होती. परिणामी दरवर्षी पाठ्यपुस्तक शाळांपर्यंत पोहोचण्यास उशिर व्हायचा. यंदा बालभारतीने पुस्तकांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. नोंदणीचा आकडा लवकर मिळाल्याने पाठ्यपुस्तके तातडीने प्रकाशित करणे शक्य झाले. जिल्ह्यातून १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांसाठी नोंदणी करण्यात आली. ही पाठ्यपुस्तके पंचायत समितीस्तरावर पोहोचविण्यात आली असून केंद्रशाळा व त्यानंतर संबंधित प्रत्येक पाठविण्यात येतील. मंगळवार (दि.२० जून) पर्यंत जिल्ह्यातील ९३.२४ टक्के शाळांपर्यंत पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली. शाळा सुरू होण्याच्या आदल्यादिवशीच उर्वरित पुस्तके पाठविण्याची तयार पूर्ण झाल्याची माहिती सुत्रानी दिली.

पहिली व आठवीच्या
पाठ्यपुस्तकांना विलंब
पहिली व आठवीच्या अभ्यासक्रमात यंदा बदल केलेला आहे. बालभारतीने या विषयांची पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहेत. हा पुस्तके अद्याप पोहोचली नाहीत. शाळेचा पहिला दिवस पुस्तकांविना जावू नये, असा जि.प. शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

सीबीएसई शाळांकडून एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ठेंगा
जिल्ह्यातील सीबीईएसई अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांनी इयत्ता १ ते १० वीतील विद्यार्थ्यांना एनसीइआरटीची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व शाळांना दिले होते. खासगी प्रकाशकांनी प्रकाशित केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही केली आहे. मात्र, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतेक सीबीएसई शाळांच्या संस्थाचालकांनी या आदेशाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना खासगी प्रकाशनाची पाठ्यपुस्तके विकत घेण्यास बंधनकारक करीत आहेत. पॅरेंट्स असोसिएशन फ ॉर चिल्ड्रन एज्युकेशनचे सचिव मनोज लडके यांनी यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली होती. दरम्यान शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व सीबीईएससी शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना नोटीस पाठवून एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकांचा वापर करा, असे कळविले. परंतु, सर्वच शाळांनी या नोटीसाला ठेंगा दाखविल्याचा आरोप पालक करीत आहेत.

Web Title: 9 lakh 91 thousand books registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.