४० शेतकरी घेणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:11 PM2019-01-23T23:11:12+5:302019-01-23T23:11:27+5:30

जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल सावली व बल्लारपूर तालुक्यातील ४० शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी बुलढाणा येथे रवाना झाले आहेत. हे शेतकरी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण घेणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या हस्ते वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले आहे.

40 farmers will take training | ४० शेतकरी घेणार प्रशिक्षण

४० शेतकरी घेणार प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देबुलडाण्यात प्रक्षेत्र प्रशिक्षण : शेतकरी रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल सावली व बल्लारपूर तालुक्यातील ४० शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी बुलढाणा येथे रवाना झाले आहेत. हे शेतकरी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण घेणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या हस्ते वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले आहे.
महाराष्ट्र फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ पुणेचे संचालक व विभागीय कृषी सहसंचालक नागपूर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्षेत्र प्रशिक्षण २२ ते २६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रक्षेत्र प्रशिक्षणात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, डोणगांव, जाणेफळ, सरस्वती, मातमड, देऊळगाव राजा, किणगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, बेळगाव, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, देऊळगाव घाट, शेगाव, काकणवाडा, जळगाव जामूद आदी ठिकाणच्या प्रगतशील शेतकºयांच्या शेतावर जावून शेतकरी प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात घेतलेले सामुहिक शेततळे, शेडनेसमधील भाजीपाला लागवड, करार शेती, प्रक्रिया उद्योग, मधुमक्षिकापालन, फळबाग लागवड, मसाला पीक लागवड याची शेतावर जावून पाहणी करुन प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रक्षेत्र प्रशिक्षणात शेतकºयासमवेत सावलीचे मंडळ कृषी अधिकारी वाघमारे, कृषी पर्यवेक्षक वरभे, अनील खिल्लारी, बयाणवार उपस्थित राहणार आहेत. शेतकºयांना रवाना करताना उपविभागीय कृषी अधिकारी डी. बी. काळे, तालुका कृषी अधिकारी वहाणे, मंडळ कृषी अधिकारी गायकवाड उपस्थित होते.

Web Title: 40 farmers will take training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.