बल्लारपुरात उभारणार २७ कोटींचे क्रीडा संकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:15 AM2018-01-22T00:15:08+5:302018-01-22T00:15:46+5:30

क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे, या उदात्त हेतूने बल्लारपुरात २७ कोटी रुपयांचे अद्ययावत क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे.

27 crore sports complex will be set up in Ballarpur | बल्लारपुरात उभारणार २७ कोटींचे क्रीडा संकूल

बल्लारपुरात उभारणार २७ कोटींचे क्रीडा संकूल

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : विविध विकासकामांचे होणार भूमिपूजन

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे, या उदात्त हेतूने बल्लारपुरात २७ कोटी रुपयांचे अद्ययावत क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे. २६ जानेवारीला राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमीपूजन करून या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर, बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा या शहरांमध्ये विविध विकासकामे होत आहेत. २४, २५ आणि २६ जानेवारी या कालावधीत या कामांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. .
२४ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता चंद्रपूर-दाताळा रस्त्यावरील इरई नदीवरील ६५.१९ कोटी रूपये किंमतीच्या पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपासून चंद्रपूर शहरातील पाच ओपनस्पेस मध्ये तयार करण्यात आलेल्या उद्यानांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
२५ जानेवारीला दुपारी १२ वाजता पोंभुर्णा येथे पाटबंधारे विभागाच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमीपूजन होणार असून त्यानंतर दुपारी १२.३० वाजता पोंभुर्णा नगर पंचायत येथे शुध्द पिण्याच्या पाण्याच्या एटीएम मशीनचे लोकार्पण, नगर पंचायत पोंभुर्णा येथे डस्टबीन वितरण होणार आहे. दुपारी १.३० वाजता पोंभुर्णा येथे वनविभागातर्फे तयार करण्यात आलेले दोन कोटी ७५ लक्ष रूपये किमतीचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्कचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळई ७.३० वा. मूल येथील नागरिकांशी जनसंपर्काच्या माध्यमातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संवाद साधतील.
२६ जानेवारीला सकाळी ९ वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता १६ कोटी रू. किंमतीच्या चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानकाच्या आधुनिकीकरण व नुतनीकरणाच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे.
दुपारी २ वाजता विसापूर नजिकच्या एमएसईबी क्वॉर्टर्सजवळ बांधण्यात येणाºया २७ कोटी रू. किमतीच्या बल्लारपूर येथील क्रीडा संकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहतील.

Web Title: 27 crore sports complex will be set up in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.