सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना २० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 05:48 AM2018-08-21T05:48:36+5:302018-08-21T05:50:13+5:30

घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली.

20-year sentence for gang rape | सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना २० वर्षांची शिक्षा

सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना २० वर्षांची शिक्षा

Next

चंद्रपूर : घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती प्रदीप के. भेंडे यांनी सोमवारी हा निकाल दिला.
कुणाल मनोहर गेडाम (२२), शुभम् बापूजी घोडाम (२१), संदीप तलांडे (२१, तिघेही रा. घंटाचौकी) व अशोक कन्नाके (२५ रा. दुर्गापूर वॉर्ड क्र. १) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
वणी (जि. यवतमाळ) येथील एक तरुण मूल तालुक्यातील एका गावात बांधकामाच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करीत होता. त्याचे गावातीलच २१ वर्षीय मुलीशी प्रेम जुळले. १४ जून २०१५ रोजी दोघेही चंद्रपूर - मूल मार्गावरील घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात फिरायला आले होते. ते गप्पा मारत असताना शुभम्, संदीप व अशोक हे तिघे आले. त्यांनी ‘फॉरेस्ट गार्ड’ असल्याची बतावणी करून त्या दोघांना येथे बसण्यासाठी १० हजारांची मागणी केली. नंतर तिघांनी कुणालला तिथे वन अधिकारी असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्या चौघांनी पैसे नसल्याचे पाहून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने स्पष्ट नकार दिला. ती ऐकत नसल्याचे पाहून त्या चौघांनी तरुणी व तिच्या प्रियकराचा मोबाइल हिसकावून घेऊन तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

न्यायालयाने कलम ३९४ अन्वये पाच वर्षे शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने शिक्षा, कलम ३७६ अन्वये २० वर्षे शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा निर्णय दिला.

Web Title: 20-year sentence for gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.