२०-२५ पोलिसांचा ताफा घालतो गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:16 AM2019-07-22T00:16:47+5:302019-07-22T00:19:41+5:30

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत ठाणेदार विलास चव्हाण यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने नव्या ठाणेदाराने अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून २० ते २५ अधिकारी असा पोलिसांचा ताफा घेऊन ठाणेदार स्वत: अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये घुसून त्यांना दम देत आहेत.

20-25 patrols police patrol | २०-२५ पोलिसांचा ताफा घालतो गस्त

२०-२५ पोलिसांचा ताफा घालतो गस्त

googlenewsNext
ठळक मुद्दे२०-२५ पोलिसांचा ताफा घालतो गस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत ठाणेदार विलास चव्हाण यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने नव्या ठाणेदाराने अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून २० ते २५ अधिकारी असा पोलिसांचा ताफा घेऊन ठाणेदार स्वत: अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये घुसून त्यांना दम देत आहेत.
पोलिसांची सतत गस्त असल्यामुळे अवैध दारू विक्री करणाºयांसोबतच सट्टा घेणाºयांचेही धाबे दणाणले आहे. अनेक पानठेल्यांवर किरकोळ प्रमाणात घेण्यात येणाºया सट्टेबाजीवर ठाणेदाराने अंकुश आणला असून ठाणेदाराची कामगिरी समाधानकारक दिसत आहे. गडचांदूर येथील वार्ड क्र.४, वार्ड क्र.५ व वार्ड क्र.६ नांदाफाटा येथील शांती कॉलनी, रामनगर अशा अनेक ठिकाणी अवैध दारूविक्रेत्यांनी थैमान घातले आहे. या अवैध दारूविक्रीवर अंकूश आणण्याकरिता अनेकदा पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र यावेळी खुद्द ठाणेदार स्वत: आपला फौजफाटा घेऊन दारू विक्रेत्यांच्या मागावर असल्यामुळे दारू विक्रेते सध्या भूमिगत झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विलास चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, पोलीस उपनिरीक्षक अरविंद जगणे तसेच महिला व पुरुष पोलिसांनी धडाकेबाज मोहीम हातात घेतली आहे. पोलीस ठाण्यामध्ये दारू विक्रेत्यांवर असणाºया तक्रारीवरून अशा विक्रेत्यांच्या घरी जाऊन पोलीस घराची झडती घेत आहेत. त्यांना दारू विक्रीपासून परावृत्त होण्याबाबत सूचना दे आहेत.

 

Web Title: 20-25 patrols police patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.