चिमूरमध्ये १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:39 PM2018-10-19T22:39:03+5:302018-10-19T22:39:41+5:30

चिमूर व नागभीड पोलिसांनी उमा नदीच्या परिसरात सापळा रचून १९ लाख ५४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांना नऊ जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

19 lakh worth of money was seized in Chimur | चिमूरमध्ये १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

चिमूरमध्ये १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ जणांना अटक : चिमूर व नागभीड पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर व नागभीड पोलिसांनी उमा नदीच्या परिसरात सापळा रचून १९ लाख ५४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांना नऊ जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
नेरी-चिमूर मार्गावरून पिकअप वाहनाने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती चिमूर-नागभीड पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी नेरी येथील उमा नदीच्या परिसरात सापळा रचून बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३२ क्यू ५२२८ व निशान टेरोनो वाहन क्रमांक एमएच ०१ बीके २५८६ या वाहनाची तपासणी केली असता वाहनात देशी-विदेशी दारूच्या १८० पेट्या आढळून आल्या. त्यामुळे सर्व दारुसाठा, तीन मोबाईल असा एकूण १९ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत फिरोज बाबा पठाण धरमपेठ हल्ली मुक्काम वरोरा, अजय वामन हजारे, रामनगर चंद्रपूर, सुमेध अश्वथामा बाहादे, राळेगाव वणी, प्रकाश गणपत खंगार, मारेगाव, अमित जयस्वाल, बुट्टीबोरी, नरसिंग गणवेनवार, मूल, रमेश गणवेनवार, मूल, मुन्ना उर्फ जितेंद्र पटवा मूल, दर्शनसिंग पटवा रा. मूल यांना अटक करण्यात आली.
ही कारवाही पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, पो. कॉ. कैलास आलाम, पोलीस शिपाई प्रल्हाद वालंदे, चालक हजारे, होमगार्ड संदीप रणदिवे आदींनी केली.
खडसंगीत ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
चिमूर : मुरपारवरून खडसंगीकडे अवैध दारुची वाहतूक करताना पोलिसांना तिघांना अटक केली. या कारवाईत ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी सकाळी करण्यात आली. अशोक सदाशीव वाघाडे (३६) मुरपार, नरेश उर्फ काल्या गौतम मेश्राम (३२) खडसंगी, गौतम बाबा पाटील (४५) खडसंगी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद मडामेच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम पोलीस शिपाई सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, कैलास आलाम आदींनी केली.

Web Title: 19 lakh worth of money was seized in Chimur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.