१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:29 AM2017-10-18T00:29:46+5:302017-10-18T00:29:56+5:30

५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मंगळवारी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले तेव्हा १९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तर १८ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाचे ....

 19 Congress and 18 Gram Panchayats in the possession of BJP | १९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देदहा ठिकाणी अपक्ष : सेनेला तीन जागा तर इतर सहा जागांवर विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मंगळवारी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले तेव्हा १९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तर १८ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. थेट गावकºयांमधून सरपंचाची ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्येही निकालाची उत्सुकता लागली होती.
चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, नागभीड, पोंभूर्णा, राजूरा, कोरपना, जिवती, वरोरा, चिमूर व भद्रावती तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी १० वाजतापासून तालुका मुख्यालयी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली होती. जवळपास एक ते दीड तासात सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. यामध्ये काँग्रेसला १९ तर भाजपला १८ तसेच शिवसेना तीन, अपक्ष सहा व गोंगपा दोन, शेतकरी संघटना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेडला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला.

मतदारांनी यशाची सुरूवात गावापासून केली आहे. रेशनवरील रॉकेल आणि साखर बंद करून शासनाने अन्याय केला. त्यामुळे मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारून बदला घेतला आहे.
- आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते.

राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाचे हे यश आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा चंद्रपूर जिल्ह्यात येत आहे. आजपर्यंत इतका निधी इतर पालकमंत्र्यांच्या काळात मिळाला नाही. मागील तीन वर्षात सर्वाधिक निधी जिल्ह्याला मिळाला आहे. केंद्र व राज्यात भक्कम सरकार असून लोकांचा कल भाजपकडे आहे.
- हरिश शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title:  19 Congress and 18 Gram Panchayats in the possession of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.