१० खासगी रुग्णालयात मोफत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:08 PM2019-01-23T23:08:50+5:302019-01-23T23:09:10+5:30

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देेशानुसार शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. गुरूवारी शहरातील १० खासगी दवाखान्यांमधे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत गोवर रूबेला लसीकरण देण्यात येणार आहे.

10 Free Hospital Vaccine at Private Hospital | १० खासगी रुग्णालयात मोफत लस

१० खासगी रुग्णालयात मोफत लस

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाची माहिती : बालकांना न चुकता गोवर आणि रूबेला लसीकरण द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देेशानुसार शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. गुरूवारी शहरातील १० खासगी दवाखान्यांमधे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत गोवर रूबेला लसीकरण देण्यात येणार आहे.
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्या जात आहे. शहरात सर्व शाळा, अंगणवाडी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून आतापर्यंत ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८१ हजार ७५६ बालकांना लस देण्यात आली आहे. ुयोग्य नियोजनाद्वारे मोहीम सुरळीतपणे पार पडण्याकरिता आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे. खासगी रूग्णालयामध्ये एक दिवस मोफत लसीकरण केल्या जाणार आहे. यापूर्वी ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही अशा पाल्यांच्या पालकांनी या अभियानाचा लाभ घेतला पाहिजे. आपला पाल्य निरोगी राहावा, याकरिता गोवर रूबेला लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली. आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. राजुरवार, डॉ. आकुलवार, डॉ. गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत व आरोग्य विभाग कर्मचारी नियोजनबद्ध व समर्पण भावनेने अभियान राबविण्यास सज्ज झाले आहेत. गोवर रूबेला लसीकरण मोहिमेत चंद्र्रपूर महानगरपालिका महाराष्ट्रात अग्रस्थानी राहावा, याकरिता आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी शहरातील सर्व शासकीय, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत दिली जात आहे.
लसीकरण उपलब्ध असणारी रूग्णालये
जलनगर येथील शिवजी हॉस्पिटल, डॉ. एम.जे. खान जटपुरा गेट शिशु हॉस्पिटल, डॉ. गोपाळ मुंदडा जटपुरा गेट येथील मुंदडा क्लिनिक, डॉ. ज्योत्स्ना उमरेडकर जयंत टॉकीज परिसर अमृता क्लिनिक, डॉ रफिक मावानी जटपुरा गेट मी अ‍ॅन्ड मम्मी हॉस्पिटल, डॉ. अमित डांगेवार बालाजी वॉर्ड, चैतन्य क्लिनिक, डॉ. अभिलाषा गावतुरे हॉस्पिटल वॉर्ड किलबिल हॉस्पिटल, डॉ. पालीवाल महाकाली वॉर्ड पालीवाल हॉस्पिटल, डॉ. प्रमोद भोयर, तुकूम येथील बाल रुग्णालय, डॉ. अभिजीत संखारी बंगाली कॅम्प येथील विवेक क्लीनिक आदी १० खासगी रूग्णालयात बालकांना मोफत लसीकरणाची सुविधा आहे.

Web Title: 10 Free Hospital Vaccine at Private Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.