आपला कम्फर्ट झोन तुम्ही कधी सोडणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:51 PM2017-11-01T13:51:14+5:302017-11-01T13:55:21+5:30

कौशल्य असेल, पण आव्हानांना भिडण्याची हिंमत नसेल तर राहाल मागेच..

When will you leave your Comfort Zone? | आपला कम्फर्ट झोन तुम्ही कधी सोडणार की नाही?

आपला कम्फर्ट झोन तुम्ही कधी सोडणार की नाही?

Next
ठळक मुद्देनवीन जबाबदाऱ्या अंगावर घेण्याची तुमची तयारी आहे की नाही?कामाची टाळाटाळ तुम्ही करीत असाल तर प्रगतीच्या टप्प्यावर तुम्ही असाल कायम शेवटच्याच बेंचवर.आव्हानांना भिडा, आपला कम्फर्ट झोन सोडा आणि पाहा काय जादू होते ती..

- मयूर पठाडे

तुम्ही रोज काय करता? काय करता म्हणजे तुमची खबरबात काही आम्हाला काढायची नाहीय, पण तुम्ही कोणीही असा, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, शेतकरी, तंत्रज्ञ, गृहिणी... अगदी कोणीही.. रोज तुम्ही चुका करता की नाही?
अनेक जणं म्हणतील, आम्ही आमचं कामच इतकं परफेक्ट करतो की आमच्याकडून एकही चूक होत नाही. किंबहुना अशी चूक होत नाही यासाठी आम्ही फार मेहनत घेतो आणि त्यामुळेच त्याबद्दल आम्ही नावाजलेही जातो, आमचं कौतुक होतं. त्यामुळेच आम्ही आमचं काम दुसºया कोणाला देत नाही किंवा सारीच कामं आम्ही स्वत:च करतो..
पण याचे दोन स्पष्ट अर्थ निघतात. एक म्हणजे रोज तेच तेच काम तुम्ही करता. तुमच्या कामाचं अगदी रुटिन झालंय आणि झापडबंद अवस्थेत तुम्ही काम करता. कारण एकच काम सातत्यानं केलं म्हणजे आपोआपच त्यात इतकं कौशल्य येतं की तुम्ही अगदी सहजपणे ते करू शकता. म्हणजेच नवीन काही शिकायची तुमची तयारी नाही. तुम्हाला आम्हाला कोशातून कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचंच नाहीए.
दुसरी गोष्टही अनेकांच्या बाबतीत लागू होऊ शकते, ती म्हणजे त्यांच्याकडून चुकाच होत नाहीत, कारण ते काहीच करत नाहीत. जे काहीच करत नाहीत, कोणतीही महत्त्वाची जबाबदारीच आपल्या अंगावर घेत नाहीत, तर त्यांच्या हातून चूक, चुका घडतील तरी कशा?
त्यामुळे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीत असलात, तरी त्याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. एकच काम तुम्ही सातत्यानं करीत असाल, तर अर्थातच नवीन गोष्टी शिकण्याला तुमचा विरोध आहे किंवा त्या तुम्हाला येत नाहीत. तुमची प्रगती व्हायची असेल, तर आपल्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडलंच पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीची टाळाटाळ करीत असाल किंवा जबाबदाºयांपासून लांब पळत असाल, तर तेही अंतिमत: तुमच्या भविष्यासाठी ते घातकच आहे.
त्यामुळे घ्या नवनवीन जबाबदाºया आपल्या अंगावर, सोडा आपला कम्फर्ट झोन आणि भिडा आव्हानांना.. तुम्हाला ते नवचैतन्य मिळवून देईल.. नक्कीच. बघा अजमावून..

Web Title: When will you leave your Comfort Zone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.