नौदलात महिलांना करिअर करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:01 AM2017-10-08T03:01:54+5:302017-10-08T03:02:33+5:30

नौदलातील युवतींना विविध विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची संधी १९९२ पासून देण्यात येते. नौदलात चांगले वेतन, चांगले भत्ते, मोफत प्रवास यासारख्या अनेक सवलती मिळतात.

The opportunity for women to pursue a career in the Navy | नौदलात महिलांना करिअर करण्याची संधी

नौदलात महिलांना करिअर करण्याची संधी

Next

- प्रा. राजेंद्र चिंचोले

नौदलातील युवतींना विविध विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची संधी १९९२ पासून देण्यात येते. नौदलात चांगले वेतन, चांगले भत्ते, मोफत प्रवास यासारख्या अनेक सवलती मिळतात. नौदलात नेतृत्वगुण, बंदराच्या इिकाणी व समुद्रात नोकरी, स्पर्धात्मक वातावरण, आव्हान पेलण्याची क्षमता, सतत शिकण्याची गरज, कर्तृत्वाला वाव मिळतो. भारतीय नौदलात अधिकारी होण्यासाठी कार्यकारी, शिक्षण अभियांत्रिकी, विधी विभागात प्रवेश घेता येतो.

नौदलातील युवतींना विविध विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची संधी आहे. नौदलात चांगले वेतन, चांगले भत्ते, मोफत वैद्यकीय सुविधा, राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था, मोफत भोजन व कपडे, मोफत प्रवास यासारख्या अनेक सवलती मिळतात. उमेदवारांना जगभर प्रवास करण्याची संधी प्राप्त होते. नौदलात नेतृत्वगुण, बंदराच्या ठिकाणी व समुद्रात नोकरी, स्पर्धात्मक वातावरण, आव्हान पेलण्याची क्षमता, सतत शिकण्याची गरज, कर्तृत्वाला वाव या संधी आहेत.
नौदलातील युवतींना विविध विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची संधी १९९२ पासून देण्यात येते. नौदलात रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार शिक्षण, विधी, शिल्पशास्त्र किंवा वास्तुशास्त्र या विभागांमध्ये कायमस्वरूपी कमिशन दिले जाते. भारतीय नौदलात भरतीसाठी ६www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज करावा लागतो.
१) शॉर्ट सर्व्हिस कमिशन - एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) : या पदासाठी वयोमर्यादा किमान १९.५ वर्षे व कमाल २५ वर्षे आहे. शैक्षणिक अर्हता ही प्रथम श्रेणीत फिजिक्स, मॅथ्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील एम. एस्सी. किंवा बी.ई/बी.टेक अशी आहे.
२) शॉर्ट सर्व्हिस कमिशन - निरीक्षण : या पदासाठी वयोमर्यादा किमान १९ वर्षे व कमाल २४ वर्षे आहे. कोणत्याही शाखेची किमान ५५ टक्के गुण मिळविणारी पदवीधर ही पात्र आहे. मात्र यासाठी बारावीत भौतिकशास्त्र किंवा गणित विषय आवश्यक आहे.
३) शॉर्ट सर्व्हिस कमिशन - कायदे किंवा विधी विभाग : या पदासाठी वयोमर्यादा किमान २२ वर्षे व कमाल २७ वर्षे आहे. विधी शाखेची पदवी, वकील म्हणून काम करणे आवश्यक आहे.
४) शॉट सर्व्हिस कमिशन - पुरवठा विभाग : या पदासाठी वयोमर्यादा १९.५ वर्षे व कमाल २५ वर्षे अशी आहे. शैक्षणिक अर्हता प्रथम श्रेणीत बी. कॉम. बी. एस्सी (आयटी), सी.ए., बी. ई किंवा बी. टेक, एम. बी. ए., एम.सी.ए. आहे.
५) नौदल शिक्षण शाखा : या पदासाठी वयोमर्यादा किमान २१ वर्षे व कमाल २५ वर्षे आहे. भौतिकशास्त्र, गणित, आणि संगणक यापैकी विषयात एम.एस्सी केलेले असावे. बी. एस्सीला भौतिकशास्त्र किंवा गणित हा विषय आवश्यक आहे.
६) नौदल इंजिनीअरिंग शाखा - शिल्पशास्त्र किंवा वास्तुशास्त्र : या पदासाठी वयोमर्यादा किमान १९.५ वर्षे व कमाल २५ वर्षे आहे. प्रथम श्रेणीत बी.ई. किंवा बी.टेक. (नेव्हल आर्किटेक्चर /मेकॅनिकल/ सिव्हिल/ मेटेलर्जी/ एरोनॉटिकल) ही पात्रता आहे.
७) विद्यापीठ प्रवेश योजना : या पदासाठी वयोमर्यादा किमान १९ वर्षे व कमाल २४ वर्षे आहे. प्रथम श्रेणीत बी.ई. किंवा बी. टेक (एरोनॉटिकल/ एरोस्पेस/ सिव्हिल/ मेटेलर्जी/ मेकॅनिकल/ नेव्हल आर्किटेक्चर) ही शैक्षणिक पात्रता आहे.
महिलांसाठी किमान उंची १५२ सेंटीमीटर ही शारीरिक पात्रता आहे. अर्ज केलेल्या महिला उमेदवारांची पदवीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार होते. त्यातील कट आॅफ गुणांपैकी अधिक गुण मिळालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाते. पात्रता प्राप्त उमेदवारांची सेवा निवड मंडळातर्फे बंगळुरू, भोपाळ, कोईम्बतूर, विशाखापट्टणम येथे दोन टप्प्यांत मुलाखत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात आय.टी., पी.पी. व ग्रुप डिस्कशन घेतले जाते. यात पात्र उमेदवारांना दुसºया टप्प्यातील मानसशास्त्र चाचणीसाठी बोलाविले जाते व यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. निवड झालेल्यांचे प्रशिक्षण इंडियन नेवल अ‍ॅकॅडमी (एझिमाला-केरळ) येथे होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नौदलात अधिकारीपदासाठी नियुक्ती केली जाते.

Web Title: The opportunity for women to pursue a career in the Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला