क्षमता नाही, दृष्टिकोनच ठरवतो तुम्ही कुठे उभे आहात, त्याची उंची!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Mon, November 06, 2017 4:20pm

पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूडच तर तुम्हाला शिकवतो खाली पडल्यावरही पुन्हा उभं राहायला आणि चालायला..

- मयूर पठाडे प्रत्येकातच काही ना काही क्षमता असते, वेगवेगळ्या क्षेत्रात.. कोणची कमी, कोणाची जास्त.. या क्षमतेवरच सारं काही अवलंबून असतं असं आपण नेहमी म्हणतो. या क्षमतेचा पुरेपुर वापर केला तरच तुम्हाला यश मिळेल, एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन एक विशिष्ट अशी उंची तुम्ही गाठाल यावर जवळपास साºयांचंच एकमत आहे.. आपली क्षमता वगैरे ठीक आहे, त्यावर बºयाच गोष्टी अवलंबून असतात, हेही ठीक आहे, पण केवळ क्षमताच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि तुमच्या यशापयशाला जबाबदार नसते. खरं तर ही क्षमता तुम्ही वापरता कि वापरत नाही यावरच सारं काही ठरतं. तुम्ही तुमची क्षमता जर वापरत नसला, तर तुमच्या त्या क्षमतेचा उपयोग तरी काय? शून्य क्षमता असली आणि शंभर टक्के क्षमता असली तरी शेवटी त्याचा निष्कर्ष काय? शून्यच.. तुम्ही आज कुठे आहात, कुठल्या टप्प्यावर, कुठल्या उंचीवर आहे, हे मुख्यत: ठरतं ते तुमच्या अ‍ॅटिट्यूडवरून.. कोणत्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावरच ठरते तुमची उंची! सकारत्मक दृष्टी असेल, तर पाऊल नेहमीच विधायक दिशेनं पुढे जाईल, जर नकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही त्याकडे साशंकतेनंच बघाल, आपलं पाऊल मागेच ठेवाल.. त्यामुळे प्रत्येकानं आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा हेच हिताचं. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानंही या सकारात्मक दृष्टिकोनाचंच महत्त्व अधोरेखित केलं आहे. खाली पडल्यावर पुन्हा उभं राहायचं कि चालणंच सोडून द्यायचं, हे तुम्हाला शिकवतो तो दृष्टिकोनच. तो सकारात्मक बनवा आणि जा पुढे.. आपल्याला हवं तिथे. आपल्याला हवं त्या उंचीवर. कोणीच तुम्हाला तिथून खेचू शकत नाही..

संबंधित

पेन्शन प्लॅनर; करिअरची एक वेगळी संधी!
‘साउंड इंजिनीअरिंग’क्षेत्रात मोठ्या संधी
पटकन शिका, ताबडतोब कमवा
जाहिरातीची दुनिया
कृषी क्षेत्रातील नवीन क्षितिजे

करिअर कडून आणखी

पेन्शन प्लॅनर; करिअरची एक वेगळी संधी!
‘साउंड इंजिनीअरिंग’क्षेत्रात मोठ्या संधी
पटकन शिका, ताबडतोब कमवा
जाहिरातीची दुनिया
कृषी क्षेत्रातील नवीन क्षितिजे

आणखी वाचा