इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:21 AM2019-01-12T11:21:39+5:302019-01-12T11:33:38+5:30

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 ते 9 किती वेळा आणि किती संख्यांत येतात ते पाहू...

Etc. 5th Scholarship Examination: - Questions related to topics- Mathematics, components- 1 to 100 | इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:लेख क्र. 12 विषय- गणित घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

महत्त्वाचे मुद्दे :-

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 ते 9 किती वेळा आणि किती संख्यांत येतात ते पाहू...

  • अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10
  • किती संख्यांत 20 19 19 19 19 19 19 19 19 10
  • किती वेळा 21 20 20 20 20 20 20 20 20 11
  • दोनअंकी संख्यात 18 18 18 18 18 18 18 18 18 9
  • किती वेळा 19 19 19 19 19 19 19 19 19 9
  • 1 ते 100 मध्ये एकअंकी संख्या = 9
  • दोनअंकी संख्या = 90
  • तीनअंकी संख्या = 1
  • सम संख्या - 50
  • विषम संख्या - 50
  • दोनअंकी सम संख्या - 45
  • दोनअंकी विषम संख्या - 45
  • एकअंकी संख्यांची बेरीज - 45
     

संख्यांची बेरीज -
1 ते 10     11 ते 20    21 ते 30     31 ते 40    41 ते 50    51 ते 60     61 ते 70     71 ते 80     81 ते 90      91 ते 100
55             155            255        355          435           555          655            755           855             955

सोडविलेली उदाहरणे :-

(1) 1 ते 200 मध्ये दोनअंकी संख्या किती आहेत?
(1) 199 (2) 90 (3) 100 (4) 190
स्पष्टीकरण : एकूण 90 दोनअंकी संख्या आहेत. तीनअंकी संख्या 900 आहेत.

(2) 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?
(1) 194 (2) 291 (3) 198 (4) 293 (2017)
स्पष्टीकरण : - 1 ते 100 संख्यात सर्वांत मोठी मूळ संख्या 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या - 3 ; 97 x 3 = 291

(3) 51 ते 100 मध्ये 8 अंक किती वेळा येतो?
(1) 15 (2) 16 (3) 17 (4) 18
स्पष्टीकरण- 58, 68, 78, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 98 मध्ये 8 हा अंक 15 वेळा येतो.

(4) दोनअंकी समसंख्या किती आहेत?
(1) 50 (2) 45 (3) 90 (4) 40
स्पष्टीकरण- समसंख्या दोनअंकी 45 आहेत.

(5) 0 हा अंक नसणाऱ्या दोनअंकी संख्या किती आहेत?
(1) 71 (2) 72 (3) 80 (4) 81
स्पष्टीकरण- दोनअंकी एकूण संख्या = 90 त्यापैकी
0 अंक असणाऱ्या संख्या = 9
0 अंक नसणाऱ्या संख्या = 90-9= 81

नमुना प्रश्न -

(1) 1 ते 100 मध्ये 4 दशकस्थानी व 3 एककस्थानी आहेत; अशा दोनअंकी संख्या अनुक्रमे किती?
(1) 10, 11 (2) 10, 9 (3) 11, 11 (4) 10, 10

(2) सर्वांत मोठी दोनअंकी समसंख्या व सर्वात मोठी एकअंकी विषम संख्या यांची बेरीज किती?
(1) 107 (2) 98 (3) 99 (4) 108

(3) 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो?
(1) 18 (2) 19 (3) 20 (4) 21

(4) 1 ते 100 मधील सर्वांत लहान व सर्वांत मोठ्या संयुक्त संख्येची बेरीज किती?
(1) 101 (2) 102 (3) 103 (4) 104

(5) 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?
(1) 20 (2) 21 (3) 19 (4) 18

(6) ज्यात 5 अंक नाही अशा 1 ते 100 मधील संख्या किती?
(1) 91 (2) 71 (3) 81 (4) 83

(7) 10 ते 40 या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो?
(1) 5 (2) 3 (3) 2 (4) या पैकी नाही

(8) 1 ते 100 मध्ये तीनअंकी किती आहेत?
(1) 100 (2) 1 (3) 90 (4) 9

(8) 1 ते 100 मध्ये 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत?
(1) 9 (2) 8 (3) 10 (4) 11

(9) दोनअंकी संख्येत 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती?
(1) 72 (2) 73 (3) 80 (4) 81

(10) 1 ते 50 मध्ये 1 अंक किती वेळा लिहावा लागतो?
(1) 11 (2) 12 (3) 14 (4) 15

(11) 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी पूर्णवर्ग संख्या व सर्वात मोठी मूळ संख्या यांच्यातील फरक किती?
(1) 1 (2) 2 (3) 3 (4) 4

(12) 1 ते 100 मध्ये एककस्थानी सर्वांत जास्त वेळा कोणता अंक येतो?
(1) 2 (2) 0 (3) 1 (4) सर्व पर्याय बरोबर

(13) दोनअंकी सम संख्या व एकअंकी विषम संख्या अनुक्रमे किती?
(1) 45, 4 (2) 45, 5 (3) 4, 45 (4) 5, 45

(14) खालीलपैकी 1 ते 100 या संख्यांशी संबंधित पर्याय निवडा?
(अ) 1 अंक 21 वेळा येतो  (ब) 0 अंक 11 वेळा येत नाही. (क) 1 ते 100 मध्ये दोनअंकी संख्या 90 आहेत.
(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर (3) फक्त क बरोबर (4) अ व क बरोबर

(15) दोनअंकी संख्यांत जितक्यावेळा 1 येते तितक्या 1 हा अंक घेऊन गुणाकार केला तर उत्तर किती येईल?
(1) 1 (2) 11 (3) 22 (4) 121

उत्तरसूची :-
(1) 2 (2) 1 (3) 3 (4) 4 (5) 2 (6) 3 (7)2 (8) 2 (9) 4 (10) 4 (11) 3 (12) 2 (13) 2 (14) 4 (15) 1

 

संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th Scholarship Examination: - Questions related to topics- Mathematics, components- 1 to 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.