इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:15 AM2019-02-06T10:15:55+5:302019-02-06T10:20:13+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 30, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा, 970 रुपयांत 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील?

Etc. 5th scholarship exam, subject-math, factor- coins and nota | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 30विषय-गणित, घटक- नाणी व नोटा

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 30, विषय-गणित, घटक- नाणी व नोटा

नमूना प्रश्न :-

(1) 970 रुपयांत 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? (२०१७)
(1) 17 (2) 18 (3) 19 (4) 20
स्पष्टीकरण- 970 : 50 = भागाकार 19 बाकी 2
ंम्हणून 50 रुपयांच्या जास्तीत जास्त 19 नोटा येतील.
पर्याय 3 बरोबर आहे.

(2) धनेशजवळ 50, 20, 10 व 5 रुपयांच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रु. असल्यास धनेशजवळ 50 रु. च्या किती नोटा आहेत?
(1) 50 (2) 12 (3) 68 (4) 34
स्पष्टीकरण- 50+20+10+5=85 ने 1020 रु. ला भागू
1020 : 85=12 : 50 रु. च्या 12 नोटा आहेत.
पर्याय क्र. 12 बरोबर

(3) सुुशांतने रु. 35, 5 पैसे ही रक्कम 35.5 रु. अशी लिहिली, तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? (2017)
(1) 45 पैसे (2) 55 पैसे (3) 50 पैसे (4) काहीही फरक पडणार नाही.
स्पष्टीकरण- 35 रु. 5 पैसे आहे, पण लिहिली 35.5 रु. म्हणजे 35 रु. 50 पैसे म्हणून फरक 35 रु. 50 पै.- 35 रु. 5 पैसे.
पर्याय क्र. 1 बरोबर

(4) धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बॅँकेत देऊन त्या रकमेच्या 10 च्या नोटा मागितल्या, तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? (2018)
(1) 80 (2) 100 (3) 120 (4) 110
स्पष्टीकरण- 50७8 = 400, 100७8 = 800
800+ 400= 1200 रु., एकूण रक्कम आहे.
आता 10 रुपयांच्या नोटासाठी 1200 - 10 = 120 नोटा आहेत.
पर्याय क्र. 3 बरोबर

(5) 5 रु., 10 रु व 20 रु. मूल्यांच्या प्रत्येकी किती समान एकत्र केल्यास 875 रु. होतील?
(1) 25 (2) 50 (3) 21 (4) 35
स्पष्टीकरण- 5+10+20- 35 रु. होतात.
875 - 35 =25 नोटा घ्याव्या लागतात.
पर्याय क्र. 1 बरोबर

नमूना प्रश्न :-

(1) एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 रु. आहे. पुस्तकांची किंमत वहीच्या किंमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे. तर 2 वह्यांची किंमत किती होईल?
(1) 41 रु. (2) 23 रु. (3) 36 रु. (4) 46 रु.

(2) प्रदीपजवळ 1०० रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयाची असे मिळून एकुण 10080 रु. आहेत, तर प्रदीपजवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत ?
(1) 20 (2) 30 (3) 40 (4) 50

(3) 300 रुपयांत 20 रुपयांच्या किती नोटा येतील?
(1) 20 (2) 40 (3) 15 (4) 6000

(4) अथर्वने सुयशकडून 2 रुपयांची 80 नाणी घेतली व तिला 5 रुपयांची 32 नाणी दिली. 5 रुपयांची 32 नाणी देऊन त्याने आर्यनकडून 10 रुपयांची 15 नाणी घेतली. ही सर्व नाणी त्याने मिलिंदला दिली. तर एकूण रकमेत काही रक्कम कमी आढळली तर खालीलपैकी कोणी रक्कम कमी किंवा जास्त दिली.?
(1) सुयश (2) आर्यन (3) मिलिंद (4) अथर्व

(5) राजूभार्इंनी आपल्याजवळील 1000 रुपये रकमेच्या 1/8 रुपये आपल्या मोठ्या मुलास व आपल्या दोन मुलींना प्रत्येकीस सहलीसाठी दिले. एकूण तिघांना मिळून किती रुपये दिले?
(1) 250 (2) 375 (3) 400 (4) 125

(6) संग्रामजवळ 10 रुपये किमतीच्या, 5 रुपये किमतीच्या आणि 20 रुपये किमतीच्या अनुक्रमे 10, 10, 15 नोटा असल्यास त्याच्याजवळील एकूण रक्कम किती?
(1) 470 रु. (2) 360 रु. (3) 440 रु. (4) 395 रु.

(7) श्रावणीकडे 5 रु. व 10 रु.च्या समान नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत दीडशे रुपये असल्यास श्रावणीकडे एकूण किती नोटा आहेत?
(1) 5 (2) 10 (3) 2 (4) 20

(8) सम्यककडे 10 रुपयांच्या नाण्यांच्या रकमेच्या दुप्पट रक्कम 20 रुपयांच्या नाण्यांची रक्कम आहे. 10 रुपयांची नाणी 24 असल्यास त्याच्याकडील 20 रुपयांच्या नोटांचा संख्या किती?
(1) 48 (2) 44 (3) 30 (4) 24

(9) 5254 रुपयांत 50 रु.च्या 5 नोटा, 1 रु. च्या 4 नोटा व उरलेल्या 100 रु. च्या नोटा आहेत, तर 100 रु. च्या नोटांची संख्या किती?
(1) 50 (2) 55 (3) 56 (4) 52

(10) सृष्टीकडे 10 व 20 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याची एकूण रक्कम 900 रुपये असल्यास 10 रुपयांच्या नोटांची एकूण रक्क्म किती?
(1) 300 रु. (2) 600 रु. (3) 400 रु. (4) 500 रु.

(11) 192 रुपयांत 5 रु., 2 रु., व 1 रु.च्या समान संख्येत एकूण नोटा किती आहेत.?
(1) 24 (2) 72 (3) 48 (4) यापैकी नाही

(12) अडीच रुपये म्हणजे किती पैसे?
(1) 2500 पैसे (2) 150 पैसे (3) 750 पैसे (4) 250 पैसे

(13) सव्वा रुपया + साडेतीन रुपये = किती?
(1) 4 रु. 75 पै. (2) 5 रु. 75 पै. (3) 3 रु. 75 पै. (4) 4 रु. 75 पै.

उत्तर सूची :-

(1) 4 (2) 3 (3) 3 (4) 2 (5) 2 (6) 1 (7) 4 (8) 1 (9) 1 (10) 1 (11) 3 (12) 4 (13) 1

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ












































 

Web Title: Etc. 5th scholarship exam, subject-math, factor- coins and nota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.