Delete : जब वी मेटमधली गीत म्हणते तसं जगा की बिन्धास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:36 PM2017-07-26T16:36:17+5:302017-07-26T16:37:06+5:30

यशस्वी माणसं कधीही भूतकाळातल्या त्रासदायक आठवणी सांभाळत वर्तमानात जगत नाहीत.

Delete unwanted memories and be successful | Delete : जब वी मेटमधली गीत म्हणते तसं जगा की बिन्धास्त!

Delete : जब वी मेटमधली गीत म्हणते तसं जगा की बिन्धास्त!

Next
ठळक मुद्देज्यांच्याशी पटत नाही, डिलीट करा त्यांचे नंबर.कशाला चेक करायचे त्यांचे एफबी अकाऊण्ट? विसरा त्यांनानव्या आनंदाला जागा करा आयुष्यात.

- निशांत महाजन

 

समजा कुणा एक्सशी अगदी जीवाभावाची, खूप घट्ट मैत्री होती आपली. पण झालं भांडण. इतकं की कधी एकमेकांचं तोंड पाहू नये. एकमेकांच्या फ्रेण्ड/चॅटलिस्टात पण राहू नये. तसं करतोही आपण. पण तरीही डोक्यातला संताप असा की, परत परत फोनमधला त्याचा/तिचा नंबर पुन्हा पुन्हा पाहत राहतो. डिलीटच करत नाही. एकमेकांचे एफबी प्रोफाईल पुन्हा पुन्हा व्हिजिट करतो.कमेण्टता तर येत नाही, पण त्या टाईमलाईनवरची मतं, फोटो पाहत चिडचिडत राहतो फक्त.

त्यानं होतं काय? फक्त संताप. फक्त चिडचिड. मूड जातो.

आणि डोक्यात गेलेली माणसं जास्तच  ठोसे मारायला लागतात.

कशाला आपण हे सगळं स्वतर्‍हून ओढवून घेतो.??

‘गेले उडत’ असं म्हणणं एवढं का अवघड असतं.?

एकतर पुन्हा पुन्हा मैत्री/नातं टिकवण्याचे प्रय} करून पाहावेत हे उत्तम, पण नाहीच जमत कधीकधी. गोष्टी  इतक्या बिघडतात की ‘ते’ नाव उच्चारलं तरी डोक्यात जातात गोष्टी एवढं बिनसलेलं असतं सगळं. आणि जी व्यक्ती आपल्याला इतकं छळते, त्रास देते, ती कशाला आपण सतत बाळगतो स्वतर्‍बरोबर? मनावर ओझं ठेवून सतत तिचाच विचार करतो.?

डिलीट मारो यार उसको लाईफ से.

तातडीनं अशा छळणार्‍या एका किंवा अनेकही व्यक्तींचे नंबर्स आपल्या फोनमधून डिलीट मारा. त्याचे जे काय एफबी अकाऊण्ट असतील, ते आपल्याला कधी दिसणारच नाही अशी सोय करा.त्यांच्या प्रोफाईलवर व्हिजिट मारण्यापेक्षा दुसरा काहीतरी उद्योग शोधा.

एकदम इझी फॉम्यरुला, जब वी मेटवाल्या गीतचा !

जी माणसं आवडत नाहीत, जी आपल्याला छळतात, हर्ट करून निघून जातात, आपल्याला हाडतूड करतात त्यांना लाईफमधून एकदम फ्लशआऊट करून टाकायचं.

गीत म्हणते तसं, ट्राय इट अ‍ॅण्ड यू विल फील बेटर.!

छळणारी माणसं, त्यांचे नंबर, त्यांच्याविषयीचे विचार सगळं सोडून दिलं तर.?

ही अशी छळकुटी माणसंच जागा बळकावून बसली आपल्या मनात, विचारात तर नव्या, हव्याहव्याशा माणसांना, आठवणींना आणि यशाला, क्रिएटिव्ह गोष्टींना जागा कशी होणार आपल्या मनात? आपल्या आयुष्यात?

Web Title: Delete unwanted memories and be successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.