सतत चिडचिडता, धोनीला विचारा आईसकुल कसं रहायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:15 PM2017-09-01T17:15:26+5:302017-09-01T17:15:41+5:30

मैदानात डुलकी काढणार्‍या धोनीवर परफॉर्मन्सचं प्रेशर नाही, आणि आपल्यावर आहे असं थोडंच आहे?

Continuous annoyance, Ask Dhoni, How to be a ice cool! | सतत चिडचिडता, धोनीला विचारा आईसकुल कसं रहायचं?

सतत चिडचिडता, धोनीला विचारा आईसकुल कसं रहायचं?

Next
ठळक मुद्देधोनीकडून दोन गोष्ट शिकल्या तरी आपलं करिअर एक्सप्रेसवेचा स्पीड घेईल!

-चिन्मय लेले

धोनीचा फोटो पाहिलात? मैदानात झोपलेला. ट्विटरवर अनेकांनी त्याचं कौतूक केलं. त्याच्या आईसकुल स्वभावाची पुन्हा चर्चा झाली. लोकांनी वारंवार सांगितलं की, असं थंड डोक्यानं काम करतो तोच जिंकतो. उगाच का धोनी काल 300 वा वन डे सामना खेळला. त्याच्यासारखा चॅम्पिअन खेळाडू तोच. पण हे सारं कितीही खरं असलं तरी लोक मैदानात बाटल्या फेकत असताना, पब्लिक रागानं पागल होत असताना एक डुलकी काढून घेऊ म्हणत मैदानात आराम करणं हे काय सोपं काम आहे का? इतक्या प्रेशरमध्ये आपण अशी डुलकी काढू शकलो असतो का? विचारा स्वतर्‍ला? उत्तर नाही असेल तर समजा की, आपण धोनीसारखं ग्रेट करिअर नाही करु शकत, कारण त्याचं कुल असणं, त्याचं शांत राहणं आणि फोकस्ड असणं आपल्याला नाही जमत.
श्रीलंका संघ हारत होता, धोनी बॅटिंग करत होता. मुळात धोनीच्या परफॉर्मन्सवरही प्रश्नचिन्ह लावणारा हा काळ. असा कठोर की तुम्ही काल किती परफॉर्म केलं, तुम्ही किती ग्रेट आहात याच्याशी कुणालाच काही देणंघेणं नाही. ग्रेट धोनीवर पण लोक कालबाह्य होण्याचे आरोप करणारच. मग आपल्या करिअरचा विचार करा, आपण तर धोनीइतकी वैयक्तिक आणि सांघिक कर्तबगारीही गाजवत नाही. आणि तरी वाटतं की, आपलं करिअर धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखं भन्नाट असावं. ते कसं जमणार?
जमावं असं वाटत असेल तर धोनीकडून दोन गोष्टी शिकायला हव्यात.
1) शांत राहणं, अ‍ॅक्शन घेणं, रिअ‍ॅक्शन बंद.
आपण सगळे सतत इतरांना रिअ‍ॅक्शन देत राहतो. कुणी अपमान केला, टोचून बोललं, आपल्याला डिवचलं, हरवलं की आपण रिअ‍ॅक्ट करतो. त्यानं गोष्टी अजून बिघडतात. धोनी तसं करत नाही. तो डोकं शांत ठेवतो, स्वतर्‍ला जे करायचं तेच करतो. दुसर्‍याच्या कण्ट्रोलमध्ये असलेली सिच्युएशन आपल्या हातात घेतो. आणि म्हणून त्याला हवे तसे रिझल्ट मिळतात.
2) दुसरं म्हणजे तो जेव्हा हरत असतो, त्याचा परफॉर्मन्स होत नाही तेव्हा तो बोलघेवडेपणा करत नाही. इतरांकडे बोट दाखवत नाही. तो शांत राहतो. काय चुकतंय हे तपासतो. ते बदलतो. स्वतर्‍वर काम करतो. आणि शांतपणे आपल्या परफॉर्मन्सने उत्तर देतो.
हे सारं आपण करतो का?
उत्तर होकारार्थी येणं तसं अवघड. म्हणून तर धोनी ग्रेट होतो आणि आपण आपलं करिअर कुठं चालललोय म्हणून चिडचिडतो, तसं कशाला करायचं?

Web Title: Continuous annoyance, Ask Dhoni, How to be a ice cool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.