Lokmat Money > बिझनेस न्यूज > झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत १७४० कोटी डॉलर्सची घट; अब्जाधीशांच्या यादीत तीन स्थानांची घसरण

झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत १७४० कोटी डॉलर्सची घट; अब्जाधीशांच्या यादीत तीन स्थानांची घसरण

फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत पाच महिन्यात तब्बल १७४० कोटी डॉलर्सची घट झाली आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीत त्यांची तीन स्थानांची घसरण झाली आहे. त्यांची जागा वॉरन बफेट यांनी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:12 AM2018-11-19T00:12:41+5:302018-11-19T00:13:01+5:30

फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत पाच महिन्यात तब्बल १७४० कोटी डॉलर्सची घट झाली आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीत त्यांची तीन स्थानांची घसरण झाली आहे. त्यांची जागा वॉरन बफेट यांनी घेतली आहे.

 Zuckerberg's property worth $ 174 million; Three places fall in the list of billionaires | झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत १७४० कोटी डॉलर्सची घट; अब्जाधीशांच्या यादीत तीन स्थानांची घसरण

झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत १७४० कोटी डॉलर्सची घट; अब्जाधीशांच्या यादीत तीन स्थानांची घसरण

मुंबई : फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत पाच महिन्यात तब्बल १७४० कोटी डॉलर्सची घट झाली आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीत त्यांची तीन स्थानांची घसरण झाली आहे. त्यांची जागा वॉरन बफेट यांनी घेतली आहे.
जगातील श्रीमंत अब्जाधीशांची यादी ‘ब्लूमबर्ग’ ने जाहीर केली आहे. या ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस हे अग्रस्थानी आहेत.
त्यांची संपत्ती १६,१०० कोटी डॉलर्स असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती ४८३० कोटी डॉलर्स आहे. ते या यादीत ११ व्या स्थानी आहेत.
अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
या यादीत पाच महिन्यांपूर्वी झुकेरबर्ग हे तिसऱ्या स्थानी होते. पण रशियातील निवडणुकीवेळी मतदारांवर प्रभाव पाडण्यासंबंधी फेसबूकवर टीका झाली होती. यामुळे कंपनीचे समभाग एप्रिल २०१७ नंतर पहिल्यांदाच १३,९५३ कोटी डॉलर्सपर्यंत घसरले. परिणामी झुकेरबर्ग या यादीत सहाव्या स्थानी फेकले गेले. त्यांची एकूण संपत्ती सध्या ६४६० कोटी डॉलर्स आहेत.

Web Title:  Zuckerberg's property worth $ 174 million; Three places fall in the list of billionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.