Workers' men decreased for the first time since 1993-94 | १९९३−९४ नंतर प्रथमच कामकरी पुरुष घटले
१९९३−९४ नंतर प्रथमच कामकरी पुरुष घटले

नवी दिल्ली - भारतात रोजगारप्राप्त पुरुषांच्या संख्येत २०१७−१८ मध्ये घट झाली आहे. १९९३−९४ नंतर पहिल्यांदाच ही घट झाल्याचे दिसून आले आहे. एनएसएसओच्या क ालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणातील (पीएलएफ ) आक डेवारीतून ही माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे लोक सभा निवडणुक ांच्या पार्श्वभूमीवर हा सर्वेक्षण अहवालच सरक ारने दाबून ठेवला आहे.
प्राप्त आक डेवारीनुसार, रोजगारप्राप्त पुरु षांची संख्या २०११− १२ मध्ये ३०.४ क ोटी होती. २0१७−१८ मध्ये ती घसरू न २८.६ क ोटी झाली. त्याआधी दोन दशक ांत रोजगारात तब्बल ८.५ क ोटींची वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर रोजगारातील ही घसरण नजरेत भरणारी आहे.
देशातील रोजगारांच्या संधी घटत असून, बेरोजगारी वाढत चालली असल्याचे श्रमशक्तीतील घसरणीतून दिसून येते. उच्चस्तरीय सूत्रांनी
सांगितले क ी, २०१७−१८ मध्ये बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला आहे. २०११−१२ च्या तुलनेत त्यात २.२ टक्के वाढ दिसून येत आहे.
श्रमशक्तीतील घसरण शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक प्रमाणात आहे. ग्रामीण भागातील घसरण ६.४ टक्के असून, शहरी भागात
ती ४.७ टक्के आहे.
अप्रक ाशित क ालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणातील आक डेवारी सांगते क ी, शहरी भागातील ७.१ टक्के पुरु ष बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील ५.८ टक्के पुरु ष बेरोजगार आहेत.


Web Title: Workers' men decreased for the first time since 1993-94
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.