Lokmat Money > बिझनेस न्यूज > निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर काम सुरू, लक्झरी वस्तूंना जगभरातील बाजारांत मागणी

निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर काम सुरू, लक्झरी वस्तूंना जगभरातील बाजारांत मागणी

नवी दिल्ली : भारतीय वस्तू व सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने बाजार संशोधनावर आधारित योग्य व्यावसायिक योजनेवर काम सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:16 AM2017-11-24T00:16:11+5:302017-11-24T00:16:25+5:30

नवी दिल्ली : भारतीय वस्तू व सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने बाजार संशोधनावर आधारित योग्य व्यावसायिक योजनेवर काम सुरू आहे

Work on promoting exports, demand for luxury goods in markets all over the world | निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर काम सुरू, लक्झरी वस्तूंना जगभरातील बाजारांत मागणी

निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर काम सुरू, लक्झरी वस्तूंना जगभरातील बाजारांत मागणी

नवी दिल्ली : भारतीय वस्तू व सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने बाजार संशोधनावर आधारित योग्य व्यावसायिक योजनेवर काम सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया लक्झरी समिट’मध्ये प्रभू यांनी ही माहिती दिली. देशांतर्गत वस्तू व सेवांची निर्यात क्षमता जाणून घेण्यासाठी बाजाराची योग्य विभागणी करणे आवश्यक आहे, असे प्रभू यांनी सांगितले. रशिया आणि लॅटीन अमेरिकेत भारताच्या वस्तू निर्यात करण्यास मोठा वाव असल्याचे मत नोंदवून प्रभू म्हणाले की, आम्ही यापैकी प्रत्येक बाजारासाठी स्वतंत्र धोरण आखण्यावर काम करीत आहोत. बाजार संशोधनावर आधारित योग्य योजनेची तयारी आम्ही करीत आहोत. बाजारांचे नीट विभाजन केल्यास कोणत्या बाजारात कोणत्या वस्तू विकल्या जाऊ शकतात, याचा शोध घेता येईल. त्यातून भारतीय वस्तू व सेवांना त्या-त्या बाजारांत शिरकाव करण्यास संधी मिळेल.
आंतरराष्टÑीय बाजारात लक्झरी वस्तूंना प्रचंड मागणी आहे, असे नमूद करून प्रभू यांनी म्हटले की, आम्ही काही रोचक पावले उचलण्याची योजना आखत आहोत. माझे मंत्रालय नवे औद्योगिक धोरण तयार करीत आहे. भारतीय वस्तूंना जागतिक पातळीवर नव्या बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
>नोटाबंदीमुळे बसला फटका
भारताची निर्यात यंदा घसरणीला लागली आहे. आॅक्टोबरमध्ये भारतीय निर्यात १.१२ टक्क्याने घसरून
२३ अब्ज डॉलरवर आली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका निर्यातीला बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Work on promoting exports, demand for luxury goods in markets all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.