Women make 20 percent less salary than men, survey information | महिलांना पुरुषांपेक्षा २0 टक्के कमी वेतन, सर्वेक्षणातील माहिती
महिलांना पुरुषांपेक्षा २0 टक्के कमी वेतन, सर्वेक्षणातील माहिती

नवी दिल्ली - भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत तब्बल २0 टक्के कमी वेतन दिले जाते, अशी माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. भारतात वेतन निर्धारणात अजूनही लैंगिक पातळीवर भेदभाव होतो, हेच यातून स्पष्ट होते.
ताज्या मॉन्स्टर वेतन निर्देशांकात (एमएसआय) ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार भारतात पुरुषांना ताशी सरासरी २३१ रुपये वेतन मिळते. महिलांना मात्र ताशी सरासरी १८४.८ रुपयेच मिळतात. महिला आणि पुरुषांच्या वेतनात आजही २0 टक्क्यांची तफावत आहे, असे ‘मॉन्स्टर डॉट कॉम-एपीएसी अ‍ॅण्ड गल्फ’चे सीईओ अभिजित मुखर्जी यांनी म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, वार्षिक आधारावर महिला आणि पुरुषातील तफावत ५ टक्क्यांनी कमी झाली आहे, ही एकच समाधानाची बाब आहे. २0१६मध्ये महिला व पुरुषांतील वेतन तफावत २४.0८ टक्के होती. कामाचा अनुभव वाढत जातो, तशी तफावत वाढत जाते. 0 ते २ वर्षांचा अनुभव असलेल्या पुरुषांना महिलांच्या तुलनेत ७.८ टक्के अधिक वेतन मिळते. ६ ते १0 वर्षे अनुभव असलेल्या पुरुषांना महिलांपेक्षा १५.३ टक्के अधिक वेतन मिळते.

लैंगिक समानतेसाठी उपक्रम आवश्यक

मॉन्स्टर डॉट कॉमने ‘वूमन आॅफ इंडिया आयएनसी’ नावाचा आणखी एक सर्व्हेही केला आहे. ५,५00 कर्मचारी महिला/पुरुषांची मते त्यात जाणून घेण्यात आली आहेत. संस्थांमध्ये लैंगिक समानता आवश्यक आहे, असे मत ६९ टक्के उत्तरदात्यांनी त्यात व्यक्त केले आहे. केवळ १0 टक्के संस्थांतच लैंगिक वैविध्य उपक्रम चालत असल्याचेही यात आढळून आले आहे.

महिलांना ताशी
सरासरी
१८४.८रु. वेतन मिळते.

पुरुषांना ताशी सरासरी
२३१रु. वेतन मिळते.


Web Title: Women make 20 percent less salary than men, survey information
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.