Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील ७ प्रमुख शहरांत ४.४ लाख घरे विक्रीविना  

देशातील ७ प्रमुख शहरांत ४.४ लाख घरे विक्रीविना  

७ प्रमुख शहरांत २०१७ च्या अखेर ४.४ लाख घरे (हौंसिंग युनिट्स) विकली गेलेली नसल्यामुळे पडून आहेत. यात सर्वात जास्त म्हणजे १.५ लाख रिकामी घरे दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत, असे मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:16 AM2018-03-05T01:16:40+5:302018-03-05T01:16:40+5:30

७ प्रमुख शहरांत २०१७ च्या अखेर ४.४ लाख घरे (हौंसिंग युनिट्स) विकली गेलेली नसल्यामुळे पडून आहेत. यात सर्वात जास्त म्हणजे १.५ लाख रिकामी घरे दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत, असे मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने सांगितले.

 Without selling 4.4 lakh homes in 7 major cities of the country | देशातील ७ प्रमुख शहरांत ४.४ लाख घरे विक्रीविना  

देशातील ७ प्रमुख शहरांत ४.४ लाख घरे विक्रीविना  

नवी दिल्ली - ७ प्रमुख शहरांत २०१७ च्या अखेर ४.४ लाख घरे (हौंिसंग युनिट्स) विकली गेलेली नसल्यामुळे पडून आहेत. यात सर्वात जास्त म्हणजे १.५ लाख रिकामी घरे दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत, असे मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने सांगितले.
जेएलएलने म्हटले की नुकत्याच केलेल्या पाहणीत २०१७ च्या अखेर भारतातील सात शहरांत ४ लाख ४० हजार घरे विक्रीविना पडून आहेत. मुंबई, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता शहरांत ही पाहणी करण्यात आली. विकल्या न गेलेल्या घरांपैकी ३४,७०० घरे ही लगेच राहायला जाता येईल अशी आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये २०१७ च्या अखेर सर्वात जास्त घरे (१,५०,६५४) विक्रीविना पडून होती, तर चेन्नईत बांधून पूर्ण झालेली, परंतु विकली न गेलेली सर्वात जास्त २० टक्के घरे आहेत, तर कोलकात्यात सर्वात कमी विकली न गेलेली घरे आहेत २६ हजार.

मागणीवर परिणाम

जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि देशाचे प्रमुख रमेश नायर म्हणाले, आर्थिक व बाजारपेठेच्या रचनेत बदल झाल्यामुळे निवासी बांधकामाची बाजारपेठ थांबा आणि वाट पाहा अशा पायरीवर आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रात नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), रेरा कायदा अमलात आल्यामुळे एकूणच बांधकामे आणि घरांच्या मागणीवर परिणाम झाला व सर्वसामान्य मंदी आली.

Web Title:  Without selling 4.4 lakh homes in 7 major cities of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.