lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

बिगर बँक वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोख तरलता कायम राहण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:17 AM2018-09-25T05:17:18+5:302018-09-25T05:17:36+5:30

बिगर बँक वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोख तरलता कायम राहण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे.

will maintain liquidity in financial institutions: Jaitley | वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

नवी दिल्ली : बिगर बँक वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोख तरलता कायम राहण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे.
दीवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसह (डीएचएफएल) अन्य एनबीएफसींमधील रोखीचे प्रमाण कमी झाल्याची चर्चा आहे. यातून एनबीएफसी संकटात असल्याचे चित्र निर्माण झाल्याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजार व राष्टÑीय शेअर बाजारात सलग दोन सत्रात घसरण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जेटली म्हणाले, एनबीएफसीतील रोखीचे प्रमाण कमी झाल्यास सरकार त्यांना आर्थिक सहकार्य देईल. एनबीएफसींमधील रोख कमी होऊ दिली जाणार नाही.

Web Title: will maintain liquidity in financial institutions: Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.