- उमेश शर्मा (चार्टर्ड अकाउंटंट)

जीएसटी या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे कमी किमतीचे कपडे काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता असून, ब्रँडेड कपडे मात्र महागणार आहेत.

कापडाचे विविध प्रकार ज्यात सिल्क, खादी, उलन, कॉटन इत्यादी नैसर्गिक धाग्यावर (फायबर) बनणारे कापड यावर व्हॅट व एक्साइज लागत नव्हते.

मानवनिर्मित धागे (फायबर) ज्यात पॉलिस्टर, सिंथेटिक इत्यादीपासून निर्माण झालेल्या कापडावर एक्साइज ड्युटी व व्हॅट लागत नव्हते.

जीएसटी अंतर्गत सर्व कापडावर ५ टक्के जीएसटी लागेल. मग ते मानवनिर्मित असो वा नैसर्गिक असो. म्हणजेच कॉटन, सिंथेटिक इत्यादी कापडावर ५ टक्के जीएसटीवर दर लागेल. त्यावर टॅक्स क्रेडिटचा रिफंड मिळणार नाही.

1000रुपयांच्या वर किंमत असल्यास रेडीमेड कापडावर आणि ब्रँडेड असल्यास एक्साइज ड्युटी २ टक्के, तसेच सेनव्हॅट घेता येणार नाही. काही अटीही लागू असतील.

रेडीमेड कापडावर व्हॅट अंतर्गत ६ टक्के दर आकारण्या येत होता.

१००० रुपयांच्या खाली रेडीमेड कापडावर किंमत असल्यास

5% जीएसटी दर आकारला जाईल.

रेडीमेड कापडावर १००० रुपयांवर किंमत असल्यास १२ टक्के जीएसटी दर आकारला जाईल

कारपेट, इत्यादी वस्तूवर १२ टक्के जीएसटी लागेल.

कापडाच्या जॉब वर्करवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.

राष्ट्रीय झेंड्यावर जीएसटी लागणार नाही.