Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स

व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स

सोशल मीडिया साइट्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठी व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत

By balkrishna.parab | Published: October 11, 2017 12:55 PM2017-10-11T12:55:56+5:302017-10-11T13:02:36+5:30

सोशल मीडिया साइट्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठी व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत

Whatsapp for Business, a new app for WhatsAppApps, these are six popular features than Regular Version. | व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स

व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स

Highlightsव्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्सव्हॉट्सअॅप फॉर बिझनेस हे अॅप सध्या बीटा मोडवर

मुंबई - सोशल मीडिया साइट्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठी व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप सध्या बीटा मोडवर असून, ते केवळ बीटा टेस्टर्सनाच गुगल प्ले स्टोअर्समधून डाऊलोड करता येईल. मात्र तुम्ही बीटा टेस्टर नसाल  आणि तुम्हालाही हे अॅप पाहायचे असेल तर त्यासाठी या अॅपची एपीके फाइल उपलब्ध आहे. व्यावसायिकांसाठी आणण्यात आलेल्या या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत. हे वैशिष्टपूर्ण फिचर्च पुढीलप्रमाणे आहेत. 
  1) लँडलाइन नंबरही अॅड करता येणार -  व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसमधील सर्वात वैशिष्ट्पूर्ण फिचर म्हणजे या अॅपमध्ये लँडलाइन नंबरही अॅड करता येतील. सध्याच्या व्हॉट्सअॅपमध्ये तशी सोय नाही. 
2) ऑटो रिप्लाय देता येणार - व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसमधील दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या अॅपवरून ऑटो रिप्लाय सेट करता येईल. या अॅपवर विशिष्ट्य तास आणि दिवसांसाठी ऑटो रिप्लाय सेट करता येतील. अशी व्यवस्था सध्या वापरात असलेल्या व्हॉट्सअॅपवर नाही. 
3) आलेल्या आणि पाठवलेल्या मेसेजची आकडेवारी कळणार - व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसचे अजून एक  वैशिष्टपूर्ण फिचर म्हणजे या अॅपवर आलेल्या आणि पाठवलेल्या मेसेजची आकडेवारी तुम्हाळा मिळेल. व्हॉट्सअॅपच्या रेग्युलर व्हर्जनमध्ये अशी व्यवस्था नाही. 
4)  व्यवसायाचं नाव आणि प्रकार  नोंदवता येणार - व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या अॅपवर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव आणि प्रकार नोंदवता येईल. त्यासाठी हे अॅप तुमच्यासमोर व्यवसायांची यादी सादर करेल. त्यामधून तुम्ही तुमच्या व्यवसायाचा प्रकार नोंदवू शकाल. मात्र या यादीत असलेल्या नावांव्यतिरिक्त अन्य प्रकारचा व्यवसाय तुम्ही करत असाल तर तुम्हाला ऑदर्स कॅटॅगरीमध्ये नोंदणी करावी लागेल. 
5)  अकाउंट होणार व्हेरिफाय - या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ट्विटर आणि फेसबुकप्रमाणे व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसवर तुमचे अकाउंट व्हेरिफाय होईल. व्हेरिफाय झालेल्या आकाउंटच्या नावासमोर ग्रीन टीक दिली जाईल. त्याचा अर्थ व्हॉट्सअॅपने हा नंबर बिझनेस अकाउंट म्हणून व्हेरिफाय केला आहे, असा असेल. 
6) लोगो असेल वेगळा - व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसचा लोगो व्हॉट्सअॅपच्या रेग्युलर व्हर्जनपेक्षा वेगळा असेत. त्यात मध्यभागी असलेल्या टेलिफोनच्या आयकॉन ऐवजी बिझनेसचा बी असेल. 
 

Web Title: Whatsapp for Business, a new app for WhatsAppApps, these are six popular features than Regular Version.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.