lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यापाऱ्यांसाठी ई-वे बिलची समस्या, जॉबवर्कसाठी काय तरतूद?

व्यापाऱ्यांसाठी ई-वे बिलची समस्या, जॉबवर्कसाठी काय तरतूद?

कृष्णा, ई-वे बील आता सर्व राज्यांमध्ये व सर्वत्र लागू झाला. परंतु अनेक व्यापाºयांना खरेदी विक्री या व्यतिरिक्त व्यवहारांसाठी ई-वे बील कसे बनवावे याबाबत संंभ्रम आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:50 AM2018-06-04T00:50:27+5:302018-06-04T00:50:27+5:30

कृष्णा, ई-वे बील आता सर्व राज्यांमध्ये व सर्वत्र लागू झाला. परंतु अनेक व्यापाºयांना खरेदी विक्री या व्यतिरिक्त व्यवहारांसाठी ई-वे बील कसे बनवावे याबाबत संंभ्रम आहे.

What is the e-pay bill problem for businessmen? | व्यापाऱ्यांसाठी ई-वे बिलची समस्या, जॉबवर्कसाठी काय तरतूद?

व्यापाऱ्यांसाठी ई-वे बिलची समस्या, जॉबवर्कसाठी काय तरतूद?

- सी. ए. उमेश शर्मा

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ई-वे बील आता सर्व राज्यांमध्ये व सर्वत्र लागू झाला. परंतु अनेक व्यापाºयांना खरेदी विक्री या व्यतिरिक्त व्यवहारांसाठी ई-वे बील कसे बनवावे याबाबत संंभ्रम आहे.
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, बरोबर आहे. खरेदी विक्री सोडून इतर अनेक व्यवहार व्यापाºयांना व्यापारासाठी करावे लागतात. जसे फ्री सॅम्पल, जॉबवर्क, वस्तू पाठविताना ग्राहक माहीत नसणे, इ. परंतु असे व्यवहार करताना त्याच्या जीएसटी व ई-वे बीलच्या तरतुदी माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
अर्जुन : कृष्णा, जॉबवर्कसाठी पाठवलेल्या वस्तूंसाठी ई-वे बील बनवावे लागते का?
कृष्ण : अर्जुना, जर वस्तूंची दळणवळण खालील कारणांसाठी होत असेल तर त्याला ई-वे बील बनवीने अनिवार्य आहे :
१) वस्तूंच्या पूरवठ्यासाठी २) पूरवठाव्यतिरिक्त इतर कारंणासाठी ३) अनोंदणीकृत व्यक्तीकडून माल खरेदी करताना.
पूरवठा व्यतिरिक्त इतर कारंणासाठी यामध्ये जॉबवर्करचा ही समावेश आहे. म्हणून ई-वे बील बनवणे गरजेचे आहे. ई-वे बील प्रिंसिपलने जॉबवर्करला दिलेल्या डिलीव्हरी चलनाच्या आधारावर बनवले जाईल. तसेच जेव्हा माल परत येईल, जॉबवर्कर डिलीव्हरी चलन बनवेल.
अर्जुन : कृष्णा, जॉबवर्कसाठी माल पाठविताना ई-वे बील न बनविण्याची ५०,००० रूपयांच्या मयार्दा लागू आहे का?
कृष्ण : अर्जुना, जॉबवर्कसाठी पाठविलेल्या वस्तूंचे दोन प्रकार आहे :
१) राज्यांतर्गत - जर वस्तू एका राज्यातून दूसºया राज्यात जॉबवर्कसाठी पाठविले तर त्याचे मूल्य कितीही असले तरी त्याचे ई-वे बील बनविणे अनिवार्य आहे.
उदा - जर औरंगाबादमधील व्यापाºयाने जॉबवर्कसाठी इंदौरला १०,००० रूपयांच्या वस्तू पाठविल्या तर त्याला ई-वे बील बनविणे अनिवार्य आहे.
२) राज्यांतर्गत - जर वस्तू राज्यांतर्गत एका ठिकाणाहून दूसºया ठिकाणी जॉबवर्कसाठी गेल्या व त्याचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ई-वे बील बनविणे गरजेचे आहे.
उदा - जर वस्तू जॉबवर्कसाठी औरंगाबादमधून नाशिकला गेल्या व त्याचे मूल्य ३०,००० रुपये असेल तर ई-वे बील बनविण्याची गरज नाही.
अजुर्न : कृष्णा, जॉबवर्कचे ई-वे बील कसे बनवावे ?
कृष्ण : अर्जुना, प्रिंसिपलला ई-वे बील बनविण्यासाठी ई-वे बीलच्या पोर्टलवर लॉग-ईन करावे लागेल व त्यानंतर खालील प्रमाणे ई-वे बील बनवावे लागेल. १) त्याने जनरेट ई-वे बीलवर क्लिक करावे. २) त्यानंतर व्यवहाराचा प्रकार-जॉबवर्क निवडावा. ३) डॉक्यूमेंटचा प्रकार - डिलीव्हरी चलन निवडावा. ४) त्यांनतर जॉबवर्कर चा जीएसटी नंबर नमूद करावा. जर जॉब वर्कर अनोंदणीकृत असेल तर ‘अनरजिस्टर्ड पर्सन’ निवडावे. ५) त्यामध्ये वस्तूचे मूल्य, वस्तूचे नाव, एसएसएन कोड, कराची रक्कम, ही सर्व माहिती डिलिव्हरी चलनच्या आधारे नमूद करावी. ६) त्यानंतर ई-वे बील पार्ट बी म्हणजेच ट्रान्सपोर्ट्स ची माहिती द्यावी.
अजुर्न : कृष्णा, ई-वे बील बनविताना जॉबवर्कसाठी पाठविलेल्या वस्तूंचे मूूल्य कोणते नमूद करावे व जॉबवर्क झाल्यानंतर ते परत येताना जॉबवर्करने कोणते मूल्य नमूद करावे ?
कृष्ण : अर्जुना, ई-वे बील डिलिव्हरी चलनच्या आधारे बनवावे. डिलिव्हरी चलनमध्ये नमूद केलेले मूल्य ई-वे बीलच्या पार्ट ‘ए’मध्ये नमूद करावे. तसेच जॉबवर्क झालेल्या वस्तू परत प्रिंसिपलला पाठविताना तेच मूल्य नमूद करावे.
उदा - ‘ए’ व्यक्तीने ब जॉबवर्करला २,००,००० रूपयांच्या वस्तू पाठविल्या तर ‘ए’ डिलीव्हरी चलन व ई-वे बीलच्या पार्ट ‘अ’मध्ये २,००,००० रुपये नमूद करेल. तसेच जेव्हा ‘बी’ जॉब वर्कर वस्तू ‘ए’ला परत पाठवितो व जॉबवर्क चार्जेस ५०,००० घेत असेल तर ‘ब’ने ई-वे बीलमध्ये २,००,००० रुपये नमूद करावे. वरील २,००,००० कसे काढावे हा मोठा प्रश्न आहे. यासाठी व्हॅल्युवेशनचे नियम पहावे.
अर्जुन : कृष्णा, जर जॉबवर्करने वस्तू प्रिंसिपलला न पाठविता ग्राहकाला पाठविल्या तर काय होईल?
कृष्ण : अर्जुना, यामध्ये दोन प्रकार आहेत. १) जर जॉबवर्कर अनोंदणीकृत असेल व जॉबवर्कर वस्तू ग्राहकाला पाठवणार असेल तर प्रिंसिपलला ई-वे बील बनवावे लागेल. २) जर जॉबवर्कर नोंदणीकृत असेल व जॉबवर्कर वस्तू ग्राहकाला पाठविणार असेल तर जॉबवर्करने प्रिंसिपलकडून बीलाची प्रत घेऊन ई-वे बील बनवावे.
अर्जुन : कृष्णा, शासन वस्तू जॉबवर्करला पाठवला आणि त्या परत आल्या हे कसे तपासेल?
कृष्ण : अजुर्ना, जॉबवर्कवर वस्तू पाठविणाºयाला त्रैमासिक आयटीसी ०४ हा फॉर्म रिटर्नमध्ये दाखल करावा लागेल. यामध्ये डिलीव्हरी चलननुसार जॉबवर्कसाठी वस्तू पाठवल्याची व परत आल्याची माहिती द्यावी लागते.
उदा - अ प्रिंंसिपलने १०० टिव्ही जॉबवर्कसाठी पाठविल्या आणि ८० परत आले. तसेच १५ टिव्ही दूसºया जॉबवर्करला दिले आणि ५ टिव्ही डायरेक्ट ग्राहकाला पाठविले असेल तर आयटीसी ०४ या फॉर्म मध्ये जॉबवर्करकडून माल कोणाकडे गेला याची माहिती द्यावी लागेल व ती पाठविलेल्या वस्तूंच्या गोळाबेरीज बरोबर जुळवणी करावी लागेल.


काय बोध घ्यावा ?
अनेक व्यापारी जॉबवर्करकडून वस्तू बनवून घेतात. शासन आता यापूढे जॉबवर्क रिटर्न व ई-वे बीलच्या आधारे जॉब वर्कसाठी पाठविलेल्या मालाची जुळवणी करेल. तसेच ई-वे बील बनविले नाही तर वस्तू जप्त होऊ शकतात व दंडही लागू शकतो. म्हणून प्रत्येकाने या तरतुदी समजावून घेऊन त्याचे पालन करावे.

Web Title: What is the e-pay bill problem for businessmen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर