lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळी भेट! पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

दिवाळी भेट! पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये कपात करत सरकारने सर्वसामान्य जनतेला दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:55 PM2017-10-09T19:55:34+5:302017-10-09T20:25:53+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये कपात करत सरकारने सर्वसामान्य जनतेला दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली आहे.

Visit Diwali! Petrol, diesel again gets cheaper | दिवाळी भेट! पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

दिवाळी भेट! पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

मुंबई -  पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये कपात करत सरकारने सर्वसामान्य जनतेला दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली आहे. पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी आणि डिझेल प्रतिलिटर एक रुपयानं स्वस्त करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन विरोधकांनी सरकरला चांगलेच अडचणीत पडले होतं. इंधन दरवाढीबाबत झालेल्या चहूबाजूच्या टीकेनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेल्या गुड न्यूजमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 25 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 26 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे 11 रुपयांचा अधिभार आकारला जातो.

डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 21 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 22 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला 19 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करते.

Web Title: Visit Diwali! Petrol, diesel again gets cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.