Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर, औरंगाबादेत करणार ५०० कोटींची गुंतवणूक

३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर, औरंगाबादेत करणार ५०० कोटींची गुंतवणूक

भारतात दरवर्षी १ कोटी फ्रिजची विक्री होती. त्यापैकी ७५ टक्के फ्रिज घरगुती वापराचे असतात. तरी देशातील फक्त ३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर होतो, असे ‘लीभेर अप्लायन्सेस’ या जर्मन कंपनीच्या अभ्यासात दिसून आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:25 AM2018-03-23T02:25:08+5:302018-03-23T02:25:08+5:30

भारतात दरवर्षी १ कोटी फ्रिजची विक्री होती. त्यापैकी ७५ टक्के फ्रिज घरगुती वापराचे असतात. तरी देशातील फक्त ३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर होतो, असे ‘लीभेर अप्लायन्सेस’ या जर्मन कंपनीच्या अभ्यासात दिसून आले आहे.

 The use of the fridge in 33 percent households, and 500 crores investment in Aurangabad | ३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर, औरंगाबादेत करणार ५०० कोटींची गुंतवणूक

३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर, औरंगाबादेत करणार ५०० कोटींची गुंतवणूक

- चिन्मय काळे

मुंबई : भारतात दरवर्षी १ कोटी फ्रिजची विक्री होती. त्यापैकी ७५ टक्के फ्रिज घरगुती वापराचे असतात. तरी देशातील फक्त ३३ टक्के घरांतच फ्रिजचा वापर होतो, असे ‘लीभेर अप्लायन्सेस’ या जर्मन कंपनीच्या अभ्यासात दिसून आले आहे.
‘लीभेर’ हा आॅटोमोबाइल गिअर्स, विमानाचे सुटे भाग तयार करणारा तसेच बांधकाम, अप्लायन्सेस अशा ११ क्षेत्रांत काम करणारा जर्मन समूह आहे. ‘लीभेर’ने औरंगाबादेत फ्रिज निर्मितीचा कारखाना उभाण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य विक्री अधिकारी राधाकृष्ण सोमयाजी व मार्केटिंग व्यवस्थापक श्रीनिवास ज्योती यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
खाद्यान्नांची सुरक्षित साठवणूक, उन्हाळ्यात थंड पेयांसाठी फ्रिज आवश्यक असतो. पण ही गरज केवळ शहरांपुरती मर्यादित असल्याचे चित्र आहे. अद्याप फ्रिज गावोगावी पोहोचलेला नाही. तसेच फ्रिज सर्वांसाठी परवडण्याजोगा नाही, हे लीभेरने केलेल्या अभ्यासात दिसून आले. जागरूकता काहीशी वाढल्याने २०२५पर्यंत फ्रिजची मागणी दरवर्षी ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. औरंगाबादजवळील शेंद्रा एमआयडीसीत लीभेर कंपनीने ५० एकर जागा घेतली आहे. तेथे ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील वर्षभरात फ्रिजनिर्मितीचा कारखाना उभा केला जाणार आहे. १ हजार लोकांना थेट रोजगार मिळेल. भारतीय सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजेनुसार तसेच येथील वाढत्या उष्णतामानानुसार आवश्यक असलेले फ्रिज तेथे तयार होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई
लीभेर कंपनीचे फ्रिज निर्मितीचे तीन कारखाने युरोपात व एक मलेशियात आहे. आता त्यांनी आशियातील मोठा कारखाना भारतात व तोदेखील महाराष्टÑात उभा करण्याच्या योजनेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी जर्मन दौऱ्यात केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरली. त्या वेळी त्यांनी जर्मनीतील उद्योजकांना महाराष्टÑात येण्याचे आवाहन केले होते.

Web Title:  The use of the fridge in 33 percent households, and 500 crores investment in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.