lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘ट्रिलियन डॉलर’साठी स्थिती सुधारण्याची गरज, उद्योजकांचे मत

‘ट्रिलियन डॉलर’साठी स्थिती सुधारण्याची गरज, उद्योजकांचे मत

राज्य सरकारने ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित करीत आंतरराष्टÑीय गुंतवणूक परिषद घेतली. मात्र हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारला विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून, स्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत अनेक उद्योजकांनी सीआयआय, महाराष्टÑच्या वार्षिक परिषदेत व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:00 AM2018-03-07T01:00:12+5:302018-03-07T01:00:12+5:30

राज्य सरकारने ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित करीत आंतरराष्टÑीय गुंतवणूक परिषद घेतली. मात्र हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारला विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून, स्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत अनेक उद्योजकांनी सीआयआय, महाराष्टÑच्या वार्षिक परिषदेत व्यक्त केले.

Trillion dollars needed to improve the situation, the opinion of the entrepreneurs | ‘ट्रिलियन डॉलर’साठी स्थिती सुधारण्याची गरज, उद्योजकांचे मत

‘ट्रिलियन डॉलर’साठी स्थिती सुधारण्याची गरज, उद्योजकांचे मत

मुंबई - राज्य सरकारने ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित करीत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषद घेतली. मात्र हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारला विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून, स्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत अनेक उद्योजकांनी सीआयआय, महाराष्ट्राच्या वार्षिक परिषदेत व्यक्त केले.
कुशल मनुष्यबळ ही औद्योगिक विकासाची गरज असते. त्यादृष्टीने राज्याची धोरणे असावीत. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविताना कृषी पूरक उद्योगांना मोठी चालना मिळायला हवी. पर्यावरण, सामाजिक सुरक्षा, न्यायिक सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष धोरण सरकारने तयार करावे, असे मत टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आर. मुकुंदन यांनी व्यक्त केले. सीआयआयचे अध्यक्ष निनाद करपे म्हणाले की, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल घडविणार आहे. त्यामुळे सध्याचे मनुष्यबळ आणि आगामी रोजगार हा तंत्रकुशल असायला हवा. त्यादृष्टीने आताच तयारी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रॉबिन बॅनर्जी यांनी उद्योगांबाबत सरकारचा व उद्योगांचा सरकारकडे बघण्याचा स्वत:चा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन केले.
कर्मचाºयांच्या गरजा मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. त्यादृष्टीने मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे मत त्यांनी मांडले.
भारत हा तरुण देश आहे. त्याचा उपयोग उत्पादकता वाढीसाठी कसा करता येईल, याबाबत विचार व्हायला हवा. त्यासंबंधीचे धोरण तयार व्हावे, असे मत अ‍ॅक्सेंचरचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष पवार यांनी व्यक्त केले.

आता लक्ष्य ‘एमएसएमई’

‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ६० टक्के मनुष्यबळ असलेल्या सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योगांशिवाय गाठणे शक्य नाही. यामुळेच आता सीआयआय एमएसएमईवर पूर्ण लक्ष केंद्रित करेल. त्यादृष्टीने यापुढे या क्षेत्राला सक्षम केले जाईल, असे सीआयआय महाराष्टÑचे उपाध्यक्ष बी. त्यागराजन म्हणाले.

Web Title: Trillion dollars needed to improve the situation, the opinion of the entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.