Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनीती भाग-२९५: आयटी रिटर्नसंबंधी असलेले प्रमुख १0 बदल

करनीती भाग-२९५: आयटी रिटर्नसंबंधी असलेले प्रमुख १0 बदल

१0 प्रमुख बदलांपैकी पहिला बदल हा पगारासंबंधी दिल्या जाणाऱ्या माहितीबद्दल आहे. आता नोकरदार वर्गाला पगारासंबंधी असलेल्या भत्त्यांची व सूटची माहिती देणे आवश्यक आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:04 AM2019-07-22T02:04:52+5:302019-07-22T02:05:06+5:30

१0 प्रमुख बदलांपैकी पहिला बदल हा पगारासंबंधी दिल्या जाणाऱ्या माहितीबद्दल आहे. आता नोकरदार वर्गाला पगारासंबंधी असलेल्या भत्त्यांची व सूटची माहिती देणे आवश्यक आहे

Top 10 changes related to IT return | करनीती भाग-२९५: आयटी रिटर्नसंबंधी असलेले प्रमुख १0 बदल

करनीती भाग-२९५: आयटी रिटर्नसंबंधी असलेले प्रमुख १0 बदल

उमेश शर्मा । सीए

अर्जुन : (काल्पनिक पात्र) कृष्णा, आर्थिक वर्ष २0१८-१९ च्या इन्कम टॅक्स रिटर्नची अंतिम तारीख ३१ जुलै २0१९ आहे तर इन्कम टॅक्स रिटर्न कोणाला दाखल करणे आवश्यक आहे व त्यासंबंधी करदात्याने कोणती काळजी घ्यावी?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २0१९ आहे व ते ज्यांचे वहीखाते ऑडिट करणे आवश्यक नाही अशा व्यक्तींना उपलब्ध आहे. जसे त्या करदात्याचे इन्कम हे पगार, भाडे, कॅपिटल गेन, इतर स्रोतांपासून असलेले रक्कम किंवा व्यवसाय जे अनुमानित कर योजनेंतर्गत दाखल केले जातात. (उदा. एकल व्यक्ती, एचयूएफ, एओपी, बीओआय इ.) उरलेल्या वर्गात जसे कंपनी, संस्थेअंतर्गत असलेले भागीदार इ. ज्यांचे वहीखाते आॅडिट करणे आवश्यक आहे अशा व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न हे ३0 सप्टेंबर २0१९ पर्यंत दाखल करावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, आयटीआर फॉर्मसंबंधी आर्थिक वर्ष २0१८-१९ मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?
कृष्ण : अर्जुना, आयटीआर फॉर्मसंबंधी खालीलप्रमाणे मुख्यत: १0 बदल नमूद केले आहेत.

नोकरदार वर्गासाठी :
१) १0 प्रमुख बदलांपैकी पहिला बदल हा पगारासंबंधी दिल्या जाणाऱ्या माहितीबद्दल आहे. आता नोकरदार वर्गाला पगारासंबंधी असलेल्या भत्त्यांची व सूटची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच करदात्याला फॉर्म १६ आणि आयटीआर फॉर्म या कोणत्याही परिस्थितीत साम्य असण्याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे.
भाडेतत्त्वावरील उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी :
२) आता करदात्याला भाड्याकरिता टॅन देणे आवश्यक आहे. जर त्याचा टीडीएस हा १९४ अंतर्गत झाला असेल व पॅन जर त्या व्यक्तीचा टीडीएस हा एखाद्या Individual किंवा HUF द्वारे १९४ IB अंतर्गत कापला गेला आहे.
कॅपिटल गेनअंतर्गत असलेल्या उत्पन्नासाठी :
३) कलम ११२ ए च्या तरतुदीनुसार, समभाग किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड जे ग्रँडफादरिंग क्लॉजप्रमाणे ज्यातून कॅपिटल गेन झाला आहे. त्यासंबंधी असलेले ठअश्चे मोजमाप हे ३१ जानेवारी २0१८ रोजीचे देणे आवश्यक आहे.
४) करदात्याला आता २ीू ११२अ नुसार पर्याय आहे की समभागानुसार करकठ कोडची माहिती देणे किंवा एकूण कॅपिटल गेनची माहिती देणे हा पर्याय कळफ २, ३,५,६ भरणाºया करदात्यांना उपलब्ध आहे.
व्यवसायातून असलेल्या नफा व उत्पन्नासंबंधी :
५) ज्या करदात्यांना संबंधित आर्थिक वर्षासाठी नफा व तोटा खाते व ताळेबंद देणे आवश्यक आहे त्या करदात्यांना उत्पादन व व्यापार खात्यांसंबंधी माहिती देणेसुद्धा बंधनकारक आहे.
दुसरे विविध बदल :
६) जर शेतीविषयक उत्पन्न हे ५ लाखांवर असेल तर शेतीसंबंधी असलेल्या जागेची माहिती (एकरमध्ये) त्याचे मालकीतत्त्व, जिल्हा, पिनकोड इ. आयटीआरमध्ये देणे गरजेचे आहे.
७) करदात्याला २६ एएसप्रमाणे भरलेल्या टीडीएससंबंधी के्रडिटसाठी कोणत्या वर्गाअंतर्गत उत्पन्न नमूद केले आहे ते देणे गरजेचे आहे.
८) करदात्याला आपल्या रहिवासी स्थितीसंबंधी सखोल माहिती देणे आवश्यक आहे.
९) कंपनीत असलेल्या डायरेक्टरशिपसंबंधी
माहिती देताना त्याचे नाव, कंपनीचे पॅनकार्ड आणि डायरेक्टरचा डीआयएन नं. आयटीआरमध्ये देणे गरजेचे आहे.
१0) वापर न केल्या गेलेल्या समभागासंबंधी माहिती देणे करदात्याला आवश्यक आहे.

Web Title: Top 10 changes related to IT return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.