हजारो भारतीयांना अमेरिकेतून परतावे लागणार, ट्रम्प प्रशासनाचे धोरण; एच-१बी व्हिसातील नियमांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 1:03am

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हाती घेतलेल्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणानुसार, एच-१बी व्हिसा नियमात आणखी बदल केले जात आहेत.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हाती घेतलेल्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणानुसार, एच-१बी व्हिसा नियमात आणखी बदल केले जात आहेत. नव्या नियमांनुसार, ज्यांचा ग्रीन कार्ड अर्ज प्रलंबित आहे, त्यांना आपला एच-१बी व्हिसा बाळगता येणार नाही. अमेरिकेत काम करणाºया हजारो भारतीयांना नव्या नियमाचा फटका बसणार असून, त्यांना तत्काळ भारतात परतावे लागेल. सूत्रांनी सांगितले की, नवा नियम लागू झाल्यास ग्रीन कार्ड अर्ज प्रलंबित असलेल्या हजारो भारतीयांच्या एच-१बी व्हिसाला मुदतवाढ देण्यात येणार नाही. अमेरिकेतील आयटी कंपन्यांत काम करणाºया भारतीयांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. सध्याच्या नियमानुसार ग्रीन कार्ड अर्ज प्रलंबित असला, तरी २ ते ३ वर्षांसाठी एच-१बी व्हिसा वाढविण्याची परवानगी आहे. नवा नियम लागू झाल्यास, सुमारे ५० हजार ते ७५ हजार भारतीयांना अमेरिका सोडून जावे लागेल. सूत्रांनी सांगितले की, सॉफ्टवेअर उद्योगातील सर्वोच्च संस्था नासकॉमने आपल्या चिंता अमेरिकी खासदार आणि प्रशासनासमोर मांडल्या आहेत. येत्या काही आठवड्यांत प्रस्तावित कायद्यावरही संस्था बातचीत करणार आहे. अमेरिकी रोजगार संरक्षण आणि वृद्धी विधेयकाच्या अनुषंगाने ट्रम्प प्रशासन व्हिसाविषयक नियमांत बदल करीत आहे. या विधेयकात एच-१बी व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची तरतूद आहे. ग्रीन कार्ड हा अमेरिकी नागरिकत्वाचा दस्तावेज आहे. ग्रीन कार्डसाठी जगभरातून लाखो लोक दरवर्षी अर्ज करीत असतात. गैरवापर रोखण्यासाठी? एच-१बी व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. नव्या नियुक्त्यांमुळे सध्या काम करणाºया कामगारांच्या नोकºयांना पुढील ५ ते ६ वर्षे कोणताही धोका नाही, अशी हमी कंपन्यांकडून घेतली जात आहे. अमेरिका सरकार दरवर्षी ८५ हजार नॉन-इमिग्रंट व्हिसा देते. ६५ हजार विदेशी नागरिकांना कामकाजी व्हिसा, तर २० हजार विदेशी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक व्हिसा दिला जातो. या कोट्यातील ७० टक्के व्हिसा भारतीयांच्या हाती लागतो. त्यातही आयटी कंपन्यांतील नियुक्त्या जास्त होतात.

संबंधित

नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान
BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव
Rafale Deal : रिलायन्ससोबत करार करण्याची होती अट? दसॉल्ट एव्हिएशनने आरोप फेटाळले 
S-400 करार :CAATSA निर्बंधांबाबतचा निर्णय भारताला लवकरच कळेल, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
भारत अंतिम फेरीत, रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा पराभव 

व्यापार कडून आणखी

जीएसटी व प्राप्तिकरातील टीडीएसच्या दांडियाचा असाही खेळ
प्लास्टिकबंदीमुळे वाढली खाद्यतेल क्षेत्राची डोकेदुखी
कोसळत्या शेअर बाजारात गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
पेट्रोल-डिझेल कपातीत ‘अशीही बनवाबनवी’, वाहतूकदारांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट
...तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; मोदी सरकारला भीती

आणखी वाचा