lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खादी उद्योगातील सात लाख रोजगार गेले! उत्पादन मात्र वाढले

खादी उद्योगातील सात लाख रोजगार गेले! उत्पादन मात्र वाढले

मोदी सरकार आल्यापासून खादी वापरणा-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी या क्षेत्रात काम करणा-यांच्या रोजगारांवर मात्र कु-हाड चालली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:23 AM2018-03-12T01:23:16+5:302018-03-12T01:23:16+5:30

मोदी सरकार आल्यापासून खादी वापरणा-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी या क्षेत्रात काम करणा-यांच्या रोजगारांवर मात्र कु-हाड चालली आहे.

There are seven lakh jobs in the Khadi industry! Production increased only | खादी उद्योगातील सात लाख रोजगार गेले! उत्पादन मात्र वाढले

खादी उद्योगातील सात लाख रोजगार गेले! उत्पादन मात्र वाढले

नवी दिल्ली - मोदी सरकार आल्यापासून खादी वापरणा-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी या क्षेत्रात काम करणा-यांच्या रोजगारांवर मात्र कु-हाड चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या क्षेत्रातील सात लाख लोकांचा रोजगार गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.
लोकसभेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, २०१५-२०१६ आणि २०१६-२०१७ या वर्षादरम्यान खादी विभागात रोजगार/नोकरीला असलेल्या लोकांची संख्या ११.६ लाखांवरून ४.६ लाखांपर्यंत खाली आली आहे. यातील काही रोजगार वा नोक-या या केवळ कागदावर नोंदलेल्या असतील व अभिलेखे अद्ययावत करण्यात त्या वगळल्या गेल्या असतील, परंतु आधुनिकीकरणामुळे नेमके किती रोजगार गेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गंमत म्हणजे, ज्या २०१५-२०१६ व २०१६-२०१७ वर्षात रोजगार/नोकºया खूप कमी झाल्या. त्याच या कालावाधीत खादीचे उत्पादन ३१.६ टक्क्यांनी वाढले व विक्री ३३ टक्क्यांनी.
नव्या पद्धतीच्या चरख्यामुळे किती रोजगार वा नोकºया गेल्या हे ना मंत्रालयाने सांगितले ना आयोगाने. एकूण ६.८ लाख रोजगार कमी झाले, त्यातील ३.२ लाख रोजगार हे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मिळून बनलेल्या मध्य विभागातील होते. जवळपास १.२ लाख रोजगार हे बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा आणि अंदमान आणि निकोबारने बनलेल्या पूर्व विभागात गेले.


नव्या चरख्यामुळे जात आहेत रोजगार?

खादी आणि ग्राम उद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) माहितीनुसार, २०१५-२०१६ वर्षात ज्या नोकºया वा रोजगार कमी झाला तेही चित्र स्पष्ट नाही. त्याचे कारण असे की, निर्माण झालेल्या नव्या रोजगारांना त्यात समाविष्ट करण्यात आले, परंतु सोडून जात असलेल्या लोकांची संख्या अद्ययावत केली गेलेली नाही. पारंपरिक एका चकतीच्या (स्पींडल) चरख्याच्या जागी नवे चरखे वापरण्यात येत असल्यामुळेही काही रोजगार गेले असू शकतात, हे केव्हीआयसीनेही मान्य केले आहे.

यापूर्वी बहुतेक सूत कातणारे हे पारंपरिक एका चकतीच्या चरख्यावर काम करायचे व हा चरखा जास्त रोजगार देणारा आहे.

नव्या पद्धतीच्या चरख्याचा वापर सुरू झाल्यामुळे अनेक जुने कारागीर निघून गेले आहेत, असे आयोगाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

Web Title: There are seven lakh jobs in the Khadi industry! Production increased only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.