तंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 3:28am

भारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील...

मुंबई : भारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा म्हणाले. येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) बेंगळुरूमध्ये अलीकडेच तंत्रज्ञान परिषद घेतली. त्यामध्ये कंपन्यांना निधी उभा करण्यासाठी एनएसईच्या तंत्रज्ञान मंचाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. भांडवली बाजार किंवा शेअर बाजार हे कंपन्यांसाठी निधी उभारणीचे सर्वोत्तम साधन आहे. यासाठीच एनएसईने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. अशावेळी ही परिषद भांडवली बाजार व स्टार्ट अप्स यांच्यातील नवीन नात्याची सुरुवात आहे, असे मत एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विक्रम लिमये यांनी व्यक्त केले. सेबीचे माजी अध्यक्ष सी.बी. भावे हे सन्माननीय अतिथी होते. ज्येष्ठ उद्योजक टी.व्ही. मोहनदास पै यांच्यासह शेअर बाजाराशी संबंधित अन्य तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा अवलंब करून भांडवली बाजारात कार्यरत असलेल्या देशभरातील १५० स्टार्ट अप्स कंपन्या या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

संबंधित

GST : पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय नाहीच, सामान्यांची निराशा
मुंबई शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा केला पार
बिनधास्त वापरा 10 रूपयांचं नाणं, आरबीआयचं स्पष्टीकरण
चार कॅमेरे असलेला Honor 9 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च

व्यापार कडून आणखी

कागदोपत्रीच असलेल्या १.२० लाख कंपन्या होणार रद्द
पेट्रोल आणि डिझेलचा भडका; महागाईत वाढ , स्वस्त होण्याची चिन्हेच नाहीत
देशाची व्यापार तूट विक्रमाकडे
‘हरिद्वार से हर द्वार तक’; पतंजली समूह झाला आॅनलाईन
रिलायन्सची प. बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक

आणखी वाचा