Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिनव्याजी कर्जावर लागणार कर

बिनव्याजी कर्जावर लागणार कर

तुम्ही पगारदार असाल व मालकाकडून बिनव्याजी कर्ज घेत असाल तर वेळीच सावध व्हा. हे कर्ज बिनव्याजी असले तरी प्राप्तिकर खाते त्यावर कर आकारणी करेलच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:00 AM2018-06-13T05:00:09+5:302018-06-13T05:00:09+5:30

तुम्ही पगारदार असाल व मालकाकडून बिनव्याजी कर्ज घेत असाल तर वेळीच सावध व्हा. हे कर्ज बिनव्याजी असले तरी प्राप्तिकर खाते त्यावर कर आकारणी करेलच.

 Taxes on interest-free loans | बिनव्याजी कर्जावर लागणार कर

बिनव्याजी कर्जावर लागणार कर

नवी दिल्ली : तुम्ही पगारदार असाल व मालकाकडून बिनव्याजी कर्ज घेत असाल तर वेळीच सावध व्हा. हे कर्ज बिनव्याजी असले तरी प्राप्तिकर खाते त्यावर कर आकारणी करेलच.
मालकाने कर्मचाऱ्याला बिनव्याजी कर्ज दिल्यानंतर प्राप्तिकर खात्याने त्यावर कर आकारल्याचे प्रकरण दिल्लीतील एका मोठ्या कंपनीत घडले. त्या प्रकरणात मालकाने कर्मचाºयाला दिलेल्या अशा कर्जावरील व्याजदर प्राप्तिकर खात्याने १५ टक्के ग्राह्य धरला. या १५ टक्क्यानुसार जी रक्कम आली ती कर्मचाºयाला कंपनीकडून (मालकाकडून) मिळालेले ‘पर्क’ म्हणून निश्चित करण्यात आली. त्यानुसार त्याच्या नियमित वार्षिक मिळकतीमध्ये ही रक्कम धरून त्यावर प्राप्तिकर आकारण्यात आला. यासंबंधी कर्मचारी, मालक यांनी प्राप्तिकर विभागाकडे विविध याचिका दाखल केल्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. मालक दरवर्षी कर्मचाºयाच्या वेतनातील काही रक्कम कर (टीडीएस) म्हणून कापून घेतो. टीडीएसची कपात होत असल्याने या दोघांमधील व्यावहारिक नाते हे निव्वळ मालक-कर्मचारी नाही. त्यामुळेच मालकाने बिनव्याजी कर दिले असले तरी ते करपात्रच आहे, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले.

अर्थचक्रामध्ये पैसा फिरतो म्हणून ‘करपात्र’

कंपन्यांकडून कर्मचाºयांना अतिरिक्त भत्ते दिले जातात. त्याला ‘पर्क’ म्हटले जाते. ‘पर्क्स’ हा नियमित पगाराचा भाग असल्याने त्याची गणना वार्षिक मिळकतीमध्ये होते. कंपन्या व्याजमुक्त कर्जही देतात. यामध्ये कर्मचारी केवळ हप्ता फेडतो. याचाच अर्थ तो बिनव्याजी पैसा वापरतो. त्यावर त्याला व्याज द्यावे लागत नसल्याने तो ज्याच्याकडून कर्ज घेतो त्याची मिळकत कमी होते. एकूणच अर्थचक्रामध्ये केवळ पैसा फिरतो. पण त्याची कर महसुलात नोंद होत नाही. यामुळेच हे व्याजमुक्त कर्ज आता करासाठी पात्र असेल.

Web Title:  Taxes on interest-free loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.